शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

Post Office Recruitment 2022: पोस्ट विभागात बंपर भरती, १ लाखाहून अधिक जागा भरणार; पात्रता आणि पगार किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 15:38 IST

Post Office Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल खात्यात बंपर भरती केली जाणार आहे.

Post Office Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल खात्यात बंपर भरती केली जाणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये पोस्टमन, मेल गार्डसह इतर अनेक पदांवर ही भरती केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार इंडिया पोस्टच्या वेबसाइट, indiapost.gov.in वरून अधिसूचनेबद्दल माहिती मिळवू शकतात. भारतीय टपाल खात्यानं या नोकर भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीनं अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवारांना वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो भरून विहित वेळेपूर्वी पाठवावा लागणार आहे. 

India Post Recruitment 2022: रिक्त जागांचा तपशीलभारतीय टपाल विभाग या भरतीद्वारे ९८,०८३ नोकऱ्या देणार आहे. देशभरातील २३ मंडळांमध्ये पोस्ट ऑफिसच्या नोकऱ्यांसाठी सरकारनं परवानगी दिली आहे. 

India Post Recruitment 2022: शैक्षणिक पात्रताटपाल खात्यात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण करणं गरजेचं असणार आहे. यासोबतच संगणकाचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे. दुसरीकडे, काही रिक्त पदांसाठी उमेदवारांनी इंटरमीडिएट म्हणजेच इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. टपाल विभागानं प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे पात्रता निश्चित केली असल्यानं शैक्षणिक आवश्यकता जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी इंडिया पोस्टच्या अधिकृत नोटिफिकेशनची माहिती घेणं आवश्यक आहे.

भारतीय टपाल विभागानं पोस्ट ऑफिसच्या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या तरुणांचं किमान वय १८ वर्षे आणि कमाल ३२ वर्षे निश्चित केलं आहे.

India Post Recruitment 2022: अर्ज प्रक्रियाभारतीय टपाल विभागाच्या या एक लाख रिक्त जागांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी indiapostgdsonline.gov.in या भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. यानंतर, रिक्त पदांची अधिसूचना पाहण्यासाठी होमपेजवर दिलेल्या भरती विभागावर क्लिक करा आणि सूचनांनुसार अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

India Post Recruitment 2022: शेवटची तारीखया पदांसाठी २३ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ऑफलाइन पद्धतीनं अर्ज स्वीकारले जातील. स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टानं नमूद पत्त्यावर अर्ज पाठवावे लागणार आहेत.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसjobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शन