शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

आंद्रे आगासी घडला कसा हे सांगणारं एक "ओपन" सिक्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 13:53 IST

मोठ्या स्पर्धा जिंकताना वारंवार येणारं अपयश, लग्नाचा फसलेला डाव ह्यातून तो नैराश्याकडे, व्यसनाधीनतेकडे ओढला गेला. 'आता हा संपला, मुळात तो तेवढा चांगला खेळाडू नव्हताच' ह्या आवया उठू लागल्या. पण राखेतून जिवंत होणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे तो पुन्हा कोर्टवर उतरला. जिंकू लागला.

ठळक मुद्देआंद्रे आगासीचं आत्मचरित्र 'ओपन' हे आत्मचरित्र.

- अपर्णा करमरकर 

एकवीस वर्षे व्यावसायिक खेळाडू म्हणून खेळल्यावर आगासी २००६ साली निवृत्त झाला. त्याचे 'ओपन' हे आत्मचरित्र. त्याच्या लहानपणापासून ते निवृत्त आयुष्यात तो करत असलेल्या समाजोपयोगी कामांपर्यंत खुलेपणाने सांगते. क्रीडा समीक्षकांचे, टीकाकारांचे मत 'आगासी कधीच 'ग्रँड स्लॅम जिंकू शकणार नाही', असे होते.  आंद्रे चार भावंडात सगळ्यात लहान. 'ला व्हेगास' ह्या गावात राहणारा. आगासीच्या वडिलांनी तो लहान असतानाच तो टेनिस चॅम्पियन होणार, जगातला एक नंबरचा खेळाडू होणार, हे ठरवून टाकलं होतं. ते क्रूर नव्हते, पण ठाम नक्की होते. त्यांनी आगासी लहान असतानाच घराच्या मागच्या दारी टेनिस कोर्ट तयार केलं होतं. एक बॉल मशीन स्वतः तयार केलं होतं. जवळपास पाळण्यात असल्यापासूनच आगासीच ट्रेनिंग त्यांनी सुरू केलं. दिवसातले ठराविक तास हे टेनिस कोर्टवर प्रॅक्टिस झाली'चं' पाहिजे, हा कडक नियम होता. सातव्या-आठव्या वर्षापासून तो त्याच्यापेक्षा मोठ्या खेळाडूंशी खेळायला लागला आणि जिंकायलाही लागला.  

तो तेरा-चौदा वर्षांचा असताना वडिलांनी त्याला फ्लोरिडाला एका टेनिस अॅकॅडमीमध्ये रवाना केलं. दिवसा शाळा आणि बाकीचा वेळ टेनिस. आगासी ह्या अॅकॅडमीचं वर्णन चक्क 'तुरुंग' असं करतो! नवव्या इयत्तेत शाळा सोडून पंधराव्या वर्षीच तो व्यावसायिक खेळाडू झाला आणि सगळ्यांचं लक्ष त्याने आपल्या चमकदार खेळाने आणि पठडीबाहेरच्या वागण्याने वेधून घेतलं. त्याला मनातून टेनिस आवडायचं नाही. इतक्या लहान वयात आपल्या कुटुंबापासून लांब राह्ल्यामुळे तो मनाने सैरभैर झाला होता. पण शिक्षणाची हेळसांड झाली होती आणि टेनिस सोडून बाकी काही कौशल्य अंगी नव्हतं. आपल्याला आयुष्यात नक्की काय करायचं आहे, हे उमजत नव्हतं. मग ती तगमग, ती ओढाताण, बंड करायची अनिवार इच्छा त्याचे चित्रविचित्र केस, कपडे आणि टेनिस कोर्टवरची आणि बाहेरची अनिर्बध वागणूक ह्यातून प्रकट होऊ लागली.

आपण ह्या खेळाडूंना एकतर टी.व्ही.च्या पडद्यावर हरताना, जिंकताना, आनंदाने नाहीतर दुःखाने रडताना बघतो. वर्तमानपत्रात त्यांच्याबद्दल येणाऱ्या चांगल्या- वाईट बातम्या वाचतो. पण त्यापलीकडे असणारा खडतर प्रवास आपल्याला कधी फार कळत नाही. बहुतेक खेळाडू अगदी लहान, नकळत्या वयात खेळायला सुरवात करतात. दिवसातला मोठा भाग प्रॅक्टिस, ट्रेनिंग मध्ये जातो. त्यामुळे अपरिहार्यपणे शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं. सतत प्रवास, सतत स्पर्धा, हार-जीत आणि त्यासोबत आशा निराशेचा जीवघेणा खेळ. कुटुंबाच्या उबदार चौकटीतून ही पाखरं वेळेआधीच पंख फुटून उडून जातात.

मनाने खंबीर असलेले, विचारांचं-संस्कारांचं पाठबळ असलेले खेळाडू ह्या परिस्थितीतही आपलं ध्येयावरचं लक्ष अढळ ठेवतात. बाकीचे काहीजण मात्र रस्ता चुकतात. हातात पैसा असतो, तारुण्याची रग असते, लहान वयात मिळालेली भरपूर प्रसिद्धीही असते. ह्यांतलं एक कारणही पाय घसरायला पुरेसं असत. मग सगळी एकत्र आल्यावर तर काय?

आगासीचही काही वेगळं झालं नाही. मोठ्या स्पर्धा जिंकताना वारंवार येणारं अपयश, लग्नाचा फसलेला डाव ह्यातून तो नैराश्याकडे, व्यसनाधीनतेकडे ओढला गेला. 'आता हा संपला, मुळात तो तेवढा चांगला खेळाडू नव्हताच' ह्या आवया उठू लागल्या. पण राखेतून जिवंत होणाऱ्या फिनिक्स पक्षाप्रमाणे तो पुन्हा कोर्टवर उतरला. जिंकू लागला. पूर्ण कारकीर्दीत सगळ्या ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि त्यासोबत ऑलिंपिक सुवर्णपदकही जिंकून तो गोल्डन स्लॅमचा मानकरी झाला.

ज्या आंद्रेला शिक्षण आवडत नव्हत, शाळा म्हणजे तुरुंग वाटायचा. त्यानेच आता व्हेगासमधल्या वंचित मुलांना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेता यावे, म्हणून शाळा सुरू केली. आगासीला आता खेळताना 'जिंकण्यासाठी जिंकणे' ह्यापेक्षा महत्त्वाचे ध्येय मिळाले. त्याच्या शाळेसाठी तो टेनिस खेळून निधी जमा करू लागला. त्याच्या बरोबरचे खेळाडू निवृत्त झाले, तरी तो आपल्या कुटुंबासाठी, शाळेतल्या मुलांसाठी खेळत राहिला.

त्याच्या वडिलांनी काहीशी जबरदस्ती करून त्याला सराव करायला लावला, ह्याबद्दलची तीव्र नाराजी ह्या पुस्तकाच्या पानापानातून जाणवते. काहीशा हट्टी, एककल्ली बापाने लहानग्या आंद्रेचं लहानपण 'टेनिस' ह्या वेठीला गच्च बांधून ठेवलं.

हे बरोबर की चूक, ह्या प्रश्नाचे उत्तर व्यक्तीप्रमाणे बदलेल. काही दिवसांपूर्वी एका हिंदी सिनेमा संदर्भात अशीच चर्चा झाली होती. कुठल्याही कारणाने का असेना, आगासी टेनिस खेळला. त्याने त्यात उल्लेखनीय यश मिळवलं. म्हणजेच त्याच्याकडे टेनिस खेळण्यासाठीचं कौशल्य, शारीरिक क्षमता नैसर्गिकरीत्या होती. अथक अशा सरावाने ह्या कौशल्याला पैलू पडले. वडिलांचा रस्ता कदाचित चुकलाही असेल. पण त्यांनी जबरदस्ती नसती केली, तर तो टेनिसपटू झाला असता का? काय माहीत?

थोडीशीच मुलं अशी असतात, की ज्यांना आपल्याला नक्की काय करायचं आहे, हे फार लहानपणी लख्ख दिसतं. बाकी मंडळी चाचपडत असतात. आई वडील स्वतःच्या वकुबाप्रमाणे निरनिराळ्या गोष्टींची ओळख करून देतात, थोडं ढकलतातही. ओळख करून देणे आणि ढकलणे, ह्यामध्ये अतिशय धूसर अशी सीमारेषा आहे. आपण नक्की कुठल्या भागात आहोत, हे व्यक्तिसापेक्ष आहे. मुलांच्या कोवळ्या शरीरावर आणि मनावर अत्याचार होणे, हे चूकच. त्याबद्दल दुमत नाही. ते होत नाही ना, ही काळजी मोठ्यांनी घेणे आणि आपले आई-वडील ही देखील माणसे आहेत. त्यांच्याकडूनही चुका होऊ शकतात, ही जाणीव मुलांनी जाणत्या वयात ठेवणे, हा मध्यममार्ग होऊ शकतो.

आपण सगळेच चरितार्थासाठी काम करतो. ती आपल्या आवडीचं असतच, असं नाही. 'ह्या' कामाऐवजी 'ते' काम मला आवडलं असत, असं शंभरातल्या नव्वद लोकांना तरी वाटत असेल. पण आपल्या चित्राची चौकट कशी असावी, हे आपल्या हातात नसलं, तरी त्या चौकटीमधील अवकाशात चित्र कसं आणि कोणतं काढायचं, हे मात्र आपल्याच हातात असतं. आंद्रे आगासीने नावडती चौकट वाट्याला आली, तरी त्याच्या शैलीदार फटकार्यांनी चित्र अप्रतिम काढलं, ह्याबद्दलची खात्री हे पुस्तक वाचून पटते.