Oil India Recruitment 2021: 04 IT Engineer And Chemist Posts, Apply Online For Sarkari Job Vacancy | Job Recruitment: ‘ऑयल इंडिया’मध्ये विविध पदांसाठी भरती; द्या ऑनलाइन मुलाखत मिळवा सरकारी नोकरी

Job Recruitment: ‘ऑयल इंडिया’मध्ये विविध पदांसाठी भरती; द्या ऑनलाइन मुलाखत मिळवा सरकारी नोकरी

मुंबई – सध्याच्या कोरोना संकटकाळामुळे अनेकांच्या हातातील रोजगार गेले आहेत, मोठमोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात केल्याने कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. मागील वर्षभरात लॉकडाऊनमुळे कंपन्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावा लागला. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य कर्मचाऱ्यांवर झाला आहे. नोकरी टीकवणं आणि घर सांभाळणं हे मोठं आव्हान नोकरदारांसमोर उभं राहिलं आहे. आता जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. अनेक ठिकाणी पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत.

त्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, भारत सरकारच्या नवरत्न कंपनी ऑयल इंडियाने(Oil India) अभियंता, केमिस्टसह वेगवेगळ्या रिक्त पदांवर भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवार १९ जानेवारी २०२१ पर्यंत या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. पदांसाठी अर्ज करण्याबाबत संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांना जाहिरात आणि लिंकची तुम्हाला या बातमीत मिळणार आहे.

पदांचा तपशील

ड्रिलिंग अभियंता - ०२ पदे – ५०,००० / -

आयटी अभियंता - ०१ पद – ४५,००० / -

केमिस्ट - ०१ पद – ५०,००० / -

अर्ज करण्याची अंतिम तारीख - १९ जानेवारी २०२१

वय मर्यादा - या पदांसाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे निश्चित केली गेली आहे.

निवड प्रक्रिया: - उमेदवारांची निवड ऑनलाइन मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

शैक्षणिक पात्रता:-  उमेदवारास किमान शिक्षण म्हणून इंजिनिअर क्षेत्रात पदवी असणे आवश्यक आहे. तपशीलवार माहितीसाठी अधिसूचना वाचा.

अर्जाची प्रक्रिया: अर्ज डाऊनलोड करुन भरा आणि शेवटच्या तारखेपूर्वी तो दिलेल्या ई-मेल आयडीवर पाठवा.

ईमेल पत्ता: con_app@oilindia.in

अधिकृत संकेतस्थळ  -  https://www.oil-india.com/

अधिसूचना आणि अर्ज भरण्यासाठी लिंकवर क्लिक करा

 

Web Title: Oil India Recruitment 2021: 04 IT Engineer And Chemist Posts, Apply Online For Sarkari Job Vacancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.