सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 22:35 IST2025-07-31T22:34:59+5:302025-07-31T22:35:58+5:30
OICL Assistant Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
सरकारीनोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच ओआयसीएलने सहाय्यक पदासाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५०० जागा भरल्या जाणार असून येत्या २ ऑगस्टपासून अर्जप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर, १७ ऑगस्ट अर्ज करण्याचा शेवटचा दिवस असेल. यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी ओआयसीएलची अधिकृत वेबसाइट orientalinsurance.org.in येथे भेट द्यावी.
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडून भरतीसंदर्भात नोटिफिकेशन जारी केले जाईल. त्यानंतर २ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होईल. नोंदणीची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०२५ आहे. दरम्यान, ७ सप्टेंबर २०२५ रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा होईल. त्यानंतर उमेरवारांची प्रादेशिक भाषा चाचणी घेतली जाईल. परंतु, ही चाचणी कधी होईल, याबाबत अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही.
पात्रता:
उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावे किंवा बारावी/समतुल्य (बारावी उत्तीर्ण) परीक्षा ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावी. त्यांचा एक विषय इंग्रजी असावा आणि त्यांना प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे, आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणारे सर्व उमेदवार १८ ते २६ वयोगटातील असावेत.
अर्ज प्रक्रिया:
- सर्वात प्रथम इच्छुक उमेदवारांने ओआयसीएलची अधिकृत वेबसाइट orientalinsurance.org.in येथे भेट द्या.
- त्यानंतर पदांच्या अर्ज लिंकवर क्लिक करा
- आवश्यक तपशील भरा, पेमेंट करा आणि नंतर सबमिट करा
- पृष्ठ डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या.