सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:33 IST2025-08-29T17:31:20+5:302025-08-29T17:33:18+5:30
NHPC JE Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे.

सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. एनएचपीसीने (NHPC) नॉन-एक्झिक्युटिव्ह पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया २ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होणार असून, १ ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरती मोहिमेअंतर्गत विविध पदांसाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये सहाय्यक राजभाषा अधिकारी (११ पदे), कनिष्ठ अभियंता सिव्हिल (१०९ पदे), कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल (४६ पदे), कनिष्ठ अभियंता मेकॅनिकल (४९ पदे), कनिष्ठ अभियंता ई अँड सी (१७ पदे), वरिष्ठ लेखापाल (१० पदे), पर्यवेक्षक आयटी (१ पदे) आणि हिंदी अनुवादक (५ पदे) यांचा समावेश आहे.
संगणक आधारित चाचणी किंवा लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. सामान्य, ओबीसी आणि ईडब्लूएस श्रेणीसाठी किमान पात्रता गुण ४० टक्के निश्चित केले आहेत. तर, एससी, एसटी आणि पीडब्लूबीडी श्रेणीसाठी ३५ टक्के निश्चित करण्यात आले. परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. ही प्रक्रिया फरीदाबा येथील एनएचपीसी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये होईल.
परीक्षेचे स्वरूप आणि वयोमर्यादा
परीक्षा एकूण २०० गुणांची असेल. कनिष्ठ अभियंता, पर्यवेक्षक आणि वरिष्ठ लेखापाल या पदांसाठी पेपर तीन भागांमध्ये विभागलेला असेल, ज्यात एकूण १४० प्रश्न विचारले जातील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. तर, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ (एक चतुर्थांश) गुण वजा केले जातील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ३० वर्षे निश्चित करण्यात आली. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना ५ वर्षे, ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची वयोमर्यादेत सूट देण्यात आली.
किती पगार मिळणार?
सहाय्यक अधिकृत भाषा अधिकारी: ४०,०००- १,४०,००० रुपये.
कनिष्ठ अभियंता: २९,६०० - १,१९, ५०० रुपये.
पर्यवेक्षक: २९,६०० - १, १९, ५०० रुपये.
वरिष्ठ लेखापाल: २९, ६०० - १, १९, ५०० रुपये.
हिंदी अनुवादक: २७,००० - १,०५,००० रुपये.