शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Government Jobs: NHM मध्ये मोठी भरती; पदवीधारकांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 16:35 IST

Government Jobs: पदवीधारकांना केंद्र सरकारच्या एका विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी आहे.

मुंबई: कोरोना संकटाच्या काळात हळूहळू अनेक गोष्टी पूर्वपदावर येताना पाहायला मिळत आहे. सरकारच्या अनेक विभागांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. पदवीधारकांना केंद्र सरकारच्या एका विभागात नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. विविध आरोग्यविषयक पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. (nhm ratnagiri recruitment 2021 for 166 posts for medical staff in ratnagiri)

राष्ट्रीय आरोग्य मिशन रत्नागिरी मध्ये १६६ पदांवर भरतीसाठी जाहिरात देण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप अर्ज केला नसेल ते रत्नागिरी प्रशासनाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध केलेला अर्ज भरू शकतात. एनएचएम रत्नागिरी भरती २०२१ साठी अर्ज करण्याची अखेरची मुदत ३१ मे २०२१ आहे.

DFCCIL: भारतीय रेल्वेच्या ‘या’ विभागात १०७४ पदांवर भरती; १.६० लाखांपर्यंत पगार

कसा कराल अर्ज?

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रत्नागिरी प्रशासनाच्या वेबसाइटवर जावे. तेथे भरती सेक्शनमध्ये जाऊन ‘रिक्रूटमेंट फॉर कोविड-19’ च्या लिंक पर क्लिक करावे. यानंतर संबंधित जाहिरात उघडेल. उमेदवार पुढे दिलेल्या डायरेक्ट लिंकद्वारे भरतीची जाहिरात डाउनलोड करू शकतात. अॅप्लिकेशन फॉर्म भरतीच्या जाहिरातीतच दिला आहे. तो अर्ज भरून तसेच विचारलेली प्रमाणपत्रे जोडून जाहिरातीत दिलेल्या मेलवर पाठवायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ मे २०२१ आहे. 

Indian Navy मध्ये २५०० हजार रिक्त पदांसाठी मोठी भरती; ६९ हजारांपर्यंत पगार

कोणत्या पदांवर किती पदे?

फिजिशियनच्या ६ पदांसाठी एमडी मेडिसीनची पदवी, एनेस्थिसियोलॉजिस्टच्या १५ पदांसाठी एमडी, डीए आणि डीएनबीची पदवी, माइक्रोबॉयोलॉजिस्टच्या २ पदांसाठी माक्रोबॉयोलॉजीमध्ये एमडीची पदवी, मेडिकल ऑफिसरच्या १५ पदांसाठी एमबीबीएस डिग्रीची पदवी, आयुष मेडिकल ऑफिसरच्या १२ पदांसाठी बीएएमएस किंवा बीयूएमएस किंवा बीडएसची पदवी, स्टाफ नर्सच्या १०० पदांसाठी बीएससी नर्सिंगची पदवी, लॅबोरेटरी टेक्निशियनच्या १६ पदांसाठी बीएससी डीएमएलटीची पदवी असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावा, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :jobनोकरीCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनEducationशिक्षण