NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 19:29 IST2026-04-07T19:28:25+5:302026-04-07T19:29:12+5:30

NCL Recruitment 2026: कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने विविध पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

NCL Recruitment 2026: Notification Out for 577 Posts; Registration Starts on April 9 at nclcil.in | NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू

NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू

कोल इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेडने विविध पदांच्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये प्रामुख्याने एचईईएमएम ऑपरेटर, पॅरामेडिकल स्टाफ आणि ओव्हरसीअर या पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांना ९ एप्रिल २०१६ पासून अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करता येईल. 

या भरती मोहिमे अंतर्गत एकूण ५७७ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी येत्या ९ एप्रिल २०२६ पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर, १ मे २०२६ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. सिंगरौली (मध्य प्रदेश) आणि सोनभद्र (उत्तर प्रदेश) हे नोकरीचे ठिकाण आहे.  इच्छुक उमेदवारांना एनसीएलच्या अधिकृत वेबसाइट www.nclcil.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.

पदे आणि पात्रता

एचईईएमएम ऑपरेटर (ट्रेनी): दहावी उत्तीर्ण आणि वैध जड वाहन चालक परवाना 
स्टाफ नर्स: बारावी उत्तीर्ण आणि नर्सिंगमधील डिप्लोमा किंवा पदवी 
ओव्हरसीअर (सिव्हिल): दहावी उत्तीर्ण आणि सिव्हिल इंजिनीअरिंगमधील ३ वर्षांचा डिप्लोमा.
इतर पदे: फार्मासिस्ट, फिजिओथेरपिस्ट आणि रेडिओग्राफर यांसारख्या पदांसाठी संबंधित विषयातील डिप्लोमा किंवा पदवी आवश्यक.

वयोमर्यादा:

उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार एसटी/एसटी उमेदवारांना ५ वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क:

UR / OBC / EWS: ₹११८० (₹ १००० शुल्क + ₹१८० सीएसटी)
SC / ST / PwBD / माजी सैनिक: कोणतेही शुल्क नाही.

निवड प्रक्रिया:

उमेदवारांची निवड १०० गुणांच्या संगणक आधारित परीक्षेच्या आधारे केली जाईल. या परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ असेल आणि विशेष म्हणजे यात नेगेटिव्ह मार्किंग असणार नाही. परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना गुणवत्ता यादीनुसार कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले जाईल.

Web Title : NCL भर्ती 2026: 577 पदों के लिए 9 अप्रैल से ऑनलाइन आवेदन करें

Web Summary : नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेड (NCL) ने ऑपरेटरों, पैरामेडिक्स और ओवरसियर सहित 577 पदों पर भर्ती की घोषणा की है। ऑनलाइन आवेदन 9 अप्रैल, 2026 से शुरू होकर 1 मई, 2026 को समाप्त होंगे। चयन कंप्यूटर आधारित परीक्षा के आधार पर होगा। www.nclcil.in पर आवेदन करें।

Web Title : NCL Recruitment 2026: Apply Online for 577 Vacancies Starting April 9

Web Summary : Northern Coalfields Limited (NCL) announces recruitment for 577 positions including operators, paramedics, and overseers. Online applications start April 9, 2026, and end May 1, 2026. The selection will be based on a computer-based test. Apply at www.nclcil.in.