Mumbai Railway Police Recruitment: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबईत रेल्वे पोलिसांच्या ५०५ पदांसाठी मेगा भरती; पाहा, सर्व तपशील 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 04:39 PM2022-05-24T16:39:01+5:302022-05-24T16:39:53+5:30

Mumbai Railway Police Recruitment: या पदांसाठीचा सविस्तर तपशील रेल्वे विभागाकडून देण्यात आला आहे. जाणून घ्या, डिटेल्स...

mumbai railway police recruitment 2022 police constable bharti 505 post vacancy for job at mumbai | Mumbai Railway Police Recruitment: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबईत रेल्वे पोलिसांच्या ५०५ पदांसाठी मेगा भरती; पाहा, सर्व तपशील 

Mumbai Railway Police Recruitment: नोकरीची सुवर्णसंधी! मुंबईत रेल्वे पोलिसांच्या ५०५ पदांसाठी मेगा भरती; पाहा, सर्व तपशील 

googlenewsNext

मुंबई: कोरोना संकटातून देशातील अनेक क्षेत्रे पूर्वपदावर येत असतानाच नोकरीच्या मोठ्या संधी प्राप्त होताना दिसत आहेत. खासगी असो वा सरकारी अनेक विभागात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यातच आता मुंबईची लाइफलाइन मानल्या जाणाऱ्या रेल्वेच्या मुंबई विभागात पोलिसांच्या शेकडो पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. (Mumbai Railway Police Recruitment) यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

इच्छूक उमेदवारांनी पदभरतीसाठी अर्ज करताना रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ५०५ रिक्त जागा

मुंबई रेल्वे पोलीस भरती अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ५०५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातून बारावी किंवा त्यासमकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या समकक्ष म्हणून ग्राह्य धरल्या जातील.

महत्त्वाचे...

पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करणाऱ्या महिला उमेदवारांची उंची १५५ सेमी असणे आवश्यक आहे. पुरुष उमेदवारांसाठी १६५ सेमी इतकी उंची असावी तर छाती ७९ सेमी पेक्षा कमी नसावी. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून ४५० रुपये तर मागास प्रवर्गातील उमेदवारांकडून ३५० रुपये अर्ज शुल्क आकारले जाणार आहे. अर्जाची शेवटची तारीख लवकरच कळविली जाणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
 

Web Title: mumbai railway police recruitment 2022 police constable bharti 505 post vacancy for job at mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.