शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

दुसर्‍याच्या नाही, पण तुमच्या स्वभावाला औषध आहे, ते घेऊन पहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:59 PM

संशाधन म्हणतं की, माणसाचा मेंदू आयुष्यभर बदलत असतो, त्या बदलाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे.

ठळक मुद्देसजगता ध्यान हा माईण्डफुलनेसचा एक भाग, तो शिकायला हवा.

-डॉ. यश वेलणकर

आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून मेंदूचे संशोधन होत आहे. त्यावरून मेंदूसंबंधी पूर्वी आपल्या अनेक जुन्या समजुती चुकीच्या होत्या असे लक्षात येते आहे। त्यातले काही गैरसमज समजून घेऊन स्वतःच्याच  मेंदूकडे नव्यानं पाहिलं, तर आपलं आयुष्य अधिक सुकर होऊ शकेल.

पहिला गैरसमज 

ठराविक वय झाले की मेंदूत बदल होणे थांबते।

सत्य

मेंदू आयुष्यभर सतत बदलत असतो।याला न्यूरॉप्लॅस्टिसटी म्हणतात. माणूस जे अनुभव घेत असतो त्यानुसार त्याच्या मेंदूत नवीन कनेक्शन तयार होत असतात. माणसाला एखादे काम सतत करावे लागले तर मेंदूतील त्या कृतीशी निगिडत भाग सक्रिय राहतो ।उदाहरणार्थ माणूस कॉम्प्युटर वर टाईप करीत असतो, त्यावेळी मेंदूतील ठराविक भाग सक्रिय असतो. हे काम सरावाचे होते त्यावेळी मेंदूच्या ते काम करणार्‍या भागात नवीन पेशी तयार होतात किंवा अशा पेशी तयार होतात त्याचवेळी ते काम सरावाचे झाले असे आपण म्हणतो।नियमित ड्रायव्हींग करणार्‍या आणि त्यासाठी दिशा लक्षात ठेवणार्‍या माणसांच्या मेंदूतील दिशांची जाणीव करून देणारा भाग विकिसत होतो असे संशोधनात दिसून आले आहे. एखादे कौशल्य वाढते त्याचे प्रत्यंतर प्रत्यक्ष मेंदूत दिसून येते. त्यामुळे जे कौशल्य आत्मसात करायचे आहे त्याचा नियमित सराव आवश्यक आहे।

दुसरा  गैरसमज

स्वभावाला औषध नाही कारण तो मेंदुत जन्मजात असतो.

सत्य 

वरील वाक्य अर्धसत्य आहे. दुसर्‍याच्या स्वभावाला औषध नाही, पण स्वतर्‍ चा स्वभाव बदलता येतो।स्वभाव म्हणजे मेंदूतील ठराविक पाथवे, एक घटना घडली की मेंदूत ठराविक भाग ,एक ठरलेला मार्ग सक्रिय होतो, त्यानुसार आपली प्रतिक्रिया असते. या प्रतिक्रि या करण्याच्या पॅटर्न ला आपण स्वभाव म्हणतो. तो बदलता येतो. निसर्गतर्‍ मेंदूत अमायगडाला नावाचा भाग सतत प्रतिक्रिया करत असतो. ही प्रतिक्रि या तीव्र असेल तर राग,चिंता,नैराश्य या भावना तीव्र असतात।माणसाचे अवधान असेल तर तो ही प्रतिक्रि या देण्याची  सवय बदलवू शकतो. माईंडफूलनेस मेडिटेशनमध्ये ही सवय बदलायची असते। शरीरावरील संवेदना जाणल्या जात आहेत पण त्यांना प्रतिक्रि या दिली जात नाही. या स्थितीत मेंदूचे परीक्षण केले असता  मेंदूतील भाविनक मेंदू म्हणजेच अमायगडाला शांत असतो आणि वैचारिक मेंदू म्हणजेच प्रीफ्रंटल कोरटेक्स मधील भावना नियंत्नण करणारा भाग अधिक सक्रिय असतो.अशी प्रतिक्रि या करण्याची सवय कमी केली की हळूहळू स्वभाव बदलतो. पण हे बदल दुसर्‍या  माणसात करणे शक्य नसते कारण त्यासाठी मेंदूतील ही जडणघडण बदलणे गरजेचे असते,म्हणून दुसर्‍याच्या  स्वभावाला औषध नाही।मेंदूतील ज्या पेशी एकाच वेळी सक्रिय असतात. त्या एकमेकांना जोडल्या जातात. त्यामुळे एखाद्या घटनेला ठराविक प्रतिक्रिया न करता माणूस वेगळा प्रतिसाद निवडतो त्यावेळी नवीन पाथवे तयार होतात, ते पाथवे दृढ झाले की स्वभाव बदलतो।मात्न केवळ बुद्धीच्या पातळीवर हे समजून उपयोग होत नाही. कारण मेंदूचे प्रोग्रामिंग बदलणे गरजेचे असते आणि ते सजगता ध्यानाच्या नियमति अभ्यासाने होते.माणूस जे काही शरीराने ,मनाने करीत असेल , मेंदूतील तो भाग त्यावेळी सक्रिय असतोच,पण ही सक्रियता तात्पुरती असते. मेंदूत रचनात्मक बदल दिसण्यासाठी ही सक्रियता अधिकाधिक वेळ राहावी लागते. याचे संशोधन झाले आहे, त्यानुसार रोज वीस मिनिटे असे दोन महिने सजगता ध्यान केले, म्हणजेच प्रतिक्रि या न करता संवेदना जाणण्याचा सराव केला की मेंदूतील भावना नियंत्नण करणारी केंद्रे विकिसत होतात हे दिसून आले आहे.