पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; एसबीआयमध्ये अधिकारी पदांसाठी भरती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 13:18 IST2020-11-14T13:15:29+5:302020-11-14T13:18:07+5:30
आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; एसबीआयमध्ये अधिकारी पदांसाठी भरती
स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. इच्छुक उमेदवार हे नोटिफिकेशन पाहून नोकरीसाठी अर्ज करू शकतात. आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
या भरतीबाबतचे नोटिफिकेशन आधी येणं अपेक्षित होतं. मात्र कोरोना परिस्थितीमुळे त्यास विलंब झाला होता. ही भरती प्रक्रिया २०२० मधील रिक्त पदांसाठी आहे. अर्ज प्रक्रिया ४ डिसेंबर २०२० पर्यंत सुरू राहणार आहे.
प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी ३१ डिसेंबर, २, ४ आणि ५ जानेवारीला पूर्व परीक्षा होईल. पूर्व परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होणारे सर्व उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील. मुख्य परीक्षा २९ जानेवारी २०२१ रोजी होईल.
पात्रता
उमेदवार पदवीधर हवेत. वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गांसाठी सवलत लागू आहे.
निवड प्रक्रिया
पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखती अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया होईल. पूर्व परीक्षा १०० गुणांची एमसीक्यू पद्धतीची असेल. इंग्रजी, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग ऍबिलिटी वर ही परीक्षा आधारित असेल. मुख्य परीक्षा २०० गुणांची असेल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नोटिफिकेशन सविस्तरपणे वाचावं.