शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
'महाराष्ट्रात कंपनी उघडी ठेवायची असेल तर..; गुजराती कंपन्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा
3
मध्यंतर...पिक्चर अभी बाकी है दौस्त! घड्याळाचे काटे पवारांकडून ठाकरे-शिंदेंकडे वळले, शहरी मतदारांवर भिस्त
4
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
5
संपादकीय: ऋण काढून सण! बचत घसरली, आता कोण वाचविणार...
6
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
7
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
8
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
9
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
10
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
11
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
12
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
13
मेलो तरी चालेल; धनुष्य-बाण, हात, कमळावर लढणार नाही; महादेव जानकर यांचे महत्वाचे वक्तव्य
14
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
15
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
16
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
17
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
18
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
19
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
20
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला

Jobs in AI : एआय टूलमध्ये मिळवा प्रभुत्व! 2.5 कोटींपर्यंत मिळेल सॅलरी, देश-विदेशातून मिळतील नोकरीच्या ऑफर्स! 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 1:08 PM

Jobs in AI : एआय संबंधित नोकऱ्यांसाठी भारतात तसेच परदेशात अर्ज करता येतो. एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरचा पगार करोडो रुपयांमध्ये असतो.

Jobs in AI Prompt Engineer Salary  ( Marathi News ) : नवी दिल्ली : सध्या जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेंसची (एआय) धूम आहे. एआयची मागणी वाढल्याने या क्षेत्रात नोकऱ्यांचा ओघही वाढला आहे. एआय संबंधित नोकऱ्यांसाठी भारतात तसेच परदेशात अर्ज करता येतो. एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरचा पगार करोडो रुपयांमध्ये असतो.

ChatGPT भारतात एआय म्हणून खूप लोकप्रिय होत आहे. काही लोकांना एआयमुळे (AI) नोकऱ्या गमवण्याची भीती आहे. पण, हे एआय लोकांसाठी (AI Jobs) रोजगाराचे साधनही बनत आहे. एआयमुळे अनेक नवीन व्यवसाय सुरू झाले आहेत. एआय प्रॉम्प्ट  इंजिनिअर (AI Prompt Engineer) देखील त्यापैकी एक आहे.

एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरच्या पोस्टसाठी जास्त मागणीआंतरराष्ट्रीय वेबसाइट zdnet.com ने एक बातमी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरच्या वाढत्या मागणीबद्दल सविस्तर लिहिले आहे. या रिपोर्टनुसार, एआय प्रॉम्प्ट इंजिनिअर्सना परदेशात $1,75,000 ते $3,00,000 पगाराची ऑफर दिली जात आहे. म्हणजेच भारतीय चलनात हे वेतन वार्षिक 1.4  कोटी ते 2.5 कोटी रुपये आहे.

एआय प्रॉम्प्ट इंजिनिअरसाठी काय आहे पात्रता?एआय प्रॉम्प्ट इंजिनिअर होण्यासाठी तुमच्याकडे काही स्किल्स असणे महत्त्वाचे आहे. या स्किल्समध्ये प्रामुख्याने प्रोग्रामिंग, एआय टूल्समधील प्राविण्य, प्रॉब्लेम सोडवणे आणि कलात्मक क्षमता यांचा समावेश होतो. यासाठी, केवळ विविध एआय टूल्सवर (AI Tools) तुमची मजबूत पकड असली पाहिजे, असे नाही तर टेक्नॉलॉजीसह अप टू डेट राहणे देखील महत्त्वाचे आहे.

वाढत्या मागणीदरम्यान एक्सपर्टची कमतरताएकीकडे एआय प्रॉम्प्ट इंजिनिअर्सची मागणी वाढत असताना दुसरीकडे त्यांची नियुक्ती करणे सोपे नाही. एक तर त्यांचा पगार खूप जास्त आहे आणि दुसरे म्हणजे एक्सपर्ट म्हणून 3 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेला उमेदवार मिळणे कठीण होत आहे. दरम्यान, हे क्षेत्र आणि यासंर्दभातील अभ्यास सुरू होऊन फार काळ लोटला नाही.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनtechnologyतंत्रज्ञान