शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

Job Alert: स्टेट बँकेत नोकरीची संधी; आजपासून अर्ज करण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 3:14 PM

SBI Bank Recruitment 2021:  एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in याची लिंक देण्यात आली आहे. तसेच खाली देखील आम्ही तुम्हाला थेट लिंक देणार आहोत. अर्ज प्रक्रिया २८ सप्टेंबर २०२१ पासून सुरु होत आहे.

बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) भरती आय़ोजित केली आहे. वेल्थ मॅनेजमेंट बिझनेस युनिटमध्ये स्पेशालिस्ट केडर ऑफिसर (SCO) पदांसह एकूण तीन जाहिराती जारी केल्या आहेत. यातून ६०६ जागांवर भरती केली जाणार आहे. (SBI Bank Recruitment 2021 for 606 sco posts.)

Bank Job Alert: TJSB Sahakari Bank मध्ये नोकरीची संधी; घाई करा, अर्ज करण्यासाठी मुदत कमी

एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर sbi.co.in याची लिंक देण्यात आली आहे. तसेच खाली देखील आम्ही तुम्हाला थेट लिंक देणार आहोत. अर्ज प्रक्रिया २८ सप्टेंबर २०२१ पासून सुरु होत आहे. शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२१ आहे. 

एसबीआयने मॅनेजमेंट बिझनेस युनिटमध्ये ज्या एससीओ पदांसाठी ५६७ जागांची घोषणा केली आहे. त्यामध्ये रिलेशनशीप मॅनेजर, रिलेशनशीप मॅनेजर (टीम लीड), कस्टमर रिलेशनशीप एग्जीक्यूटिव, इन्वेस्टमेंट ऑफिसर, सेंट्रल रिसर्च टीम (प्रोडक्ट लीड),सेंट्रल रिसर्च टीम (सपोर्ट)  ही पदे आहेत. इच्छुक उमेदवार CRPD/SCO-WEALTH/2021-22/17 या जाहिरात क्रमांकाची जाहिरात पाहू शकतात. अर्ज करताना 750 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. 

SBI Recruitment 2021: 38 SCO भरतीभारतीय स्टेट बँकेने स्पेशालिस्ट केडर ऑफिसरसाठी मॅनेजर (मार्केटिंग) आणि डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) साठी एकूण ३८ जागांवर  भरती आयोजित केली आहे. यासाठीचा जाहिरात क्रमांक CRPD/SCO/2021-22/15 हा आहे. 

SBI Recruitment 2021: 1 SCO भरती एसबीआयने स्पेशालिस्ट केडर ऑफिसरसाठी एग्जीक्यूटिव (डॉक्यूमेंट प्रीजर्वेशन-आर्काइव्स) च्या एका पदासाठी तिसरी जाहिरात  प्रसिद्ध केली आहे. CRPD/SCO/2021-22/16 हा जाहिरात क्रमांक आहे. 

जाहिराती पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...

टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाjobनोकरी