Bank Job Alert: TJSB Sahakari Bank मध्ये नोकरीची संधी; घाई करा, अर्ज करण्यासाठी मुदत कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 03:47 PM2021-09-24T15:47:52+5:302021-09-24T15:48:44+5:30

Bank Recruitment 2021, TJSB Sahakari Bank Jobs: देशातील एका प्रमुख राज्यांतर्गत सहकारी बँकांपैकी एक असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेने भरती आयोजित केली आहे. यंदा पासआऊट झालेल्या, बँकेत नोकरीची (Bank Jobs) संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे.

TJSB Sahakari Bank Recruitment 2021: Apply for post of trainee officers | Bank Job Alert: TJSB Sahakari Bank मध्ये नोकरीची संधी; घाई करा, अर्ज करण्यासाठी मुदत कमी

Bank Job Alert: TJSB Sahakari Bank मध्ये नोकरीची संधी; घाई करा, अर्ज करण्यासाठी मुदत कमी

googlenewsNext

Bank Recruitment 2021, TJSB Sahakari Bank Jobs: यंदा पासआऊट झालेल्या, बँकेतनोकरीची (Bank Jobs) संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडमध्ये नोकरी मिळविण्याची संधी चालून आली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. (THANE JANATA SAHAKARI BANK LTD Recruitment. )

देशातील एका प्रमुख राज्यांतर्गत सहकारी बँकांपैकी एक असलेल्या टीजेएसबी सहकारी बँकेने ट्रेनी ऑफिसर पदासाठी भरती आयोजित केली आहे. इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर tjsbbank.co.in/career वर जाऊन अर्ज करू शकतात. जाहिरातीची लिंक खाली देण्यात आली आहे. (TJSB Sahakari Bank recruitment 2021: Apply for post of Trainee Officers, check detailed notification here.)

पदवीधर उमेदवार बँकेत नोकरीसाठी अर्ज करू शकतात. टीजेएसबी ऑफिसर ट्रेनी भरतीसाठी ऑनलाईन अर्ज 24 सप्टेंबर 2021 पासून सुरु झाले आहेत. योग्य उमेदवार 3 ऑक्टोबरच्या आधी ऑनलाईनद्वारे अर्ज करू शकतात. टीजेएसबी बँकेत भरती 2021 नोटिफिकेशनची लिंक खाली देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी नियम, अटी वाचून घ्याव्यात.
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी प्राप्त उमेदवार ट्रेनी ऑफिसर पोस्टसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराचा जन्म 0 सप्टेंबर 1993 आणि 31 ऑगस्ट 2001 या दरम्यान झालेला असायला हवा. म्हणजेच कमीतकमी वय हे 20 ते 28 वर्षे आहे. 

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे. यामध्ये रिझनिंग, इंग्रजी, जनरल अवेअरनेस आणि क्वांटिटेटिव्ह अॅप्टीट्यूड असे 50-50 मार्कांचे 20 प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा 120 मिनिटांची असेल. निगेटिव्ह मार्किंगची देखील काळजी घ्यावी लागेल. बँक भरती परीक्षेचे अॅडमीट कार्ड परीक्षेच्या आधी बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जारी केले जाईल. परीक्षेत पास होणाऱ्या उमेदवाराला इंटरव्ह्यूसाठी बोलविले जाईल. 

TJSB सहकारी बँक भरतीसाठी उमेदवारांना 826 रुपये अर्ज शुल्क आकरण्यात येणार आहे. 

TJSB सहकारी बँक भरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी इथे क्लिक करा... 

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी इथे क्लिक करा...

 

Read in English

Web Title: TJSB Sahakari Bank Recruitment 2021: Apply for post of trainee officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.