दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, 1646 पदांसाठी भरती, उद्यापासून करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 18:27 IST2024-01-09T18:26:58+5:302024-01-09T18:27:48+5:30
उमेदवार 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

दहावी उत्तीर्णांसाठी रेल्वेत नोकरीची संधी, 1646 पदांसाठी भरती, उद्यापासून करा अर्ज
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेतनोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने 1646 पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. उद्या, 10 जानेवारी 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. उमेदवार 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
अधिकृत वेबसाइट rrcjapur.in द्वारे अर्जाचा फॉर्म सबमिट करावा लागेल. ही भरती प्रकिया उत्तर पश्चिम रेल्वेने शिकाऊ पदांसाठी राबवली आहे. उमेदवारांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसारच अर्ज सादर करावा. नियमानुसार सादर केलेला अर्जच वैध असणार आहे. अर्ज पोस्टाने किंवा इतर मार्गाने सबमिट केले जाऊ शकत नाहीत.
कोण करू शकतं अर्ज?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 50 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याशिवाय, संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पदवी असणे आवश्यक आहे. आयटीआय पदवी नसलेले तरुण अर्ज करण्यास पात्र नाहीत.
वयोमर्यादा
अर्जदाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे. एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
असा करावा अर्ज...
- अधिकृत वेबसाइट rrcjapur.in वर जा.
- येथे Recruitment सेक्शनमध्ये जा.
- आता Apprentice Recruitment Notification वर क्लिक करा.
- यानंतर मार्गदर्शक तत्त्वे वाचा आणि अर्ज करा.
- फी भरा आणि सबमिट करा.
निवड प्रक्रिया
प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची गुणवत्तेद्वारे निवड केली जाईल. दहावी आणि आयटीआयमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे गुणवत्ता तयार केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना रेल्वेने विहित केलेले स्टायपेंड देखील दिले जाईल. निवडलेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. कागदपत्र पडताळणीशिवाय कोणत्याही उमेदवाराची नियुक्ती केली जाणार नाही.