शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Agniveer Recruitment 2022: अग्निवीर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी, 8वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज, 5 ग्रेड्सवर होईल भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 15:55 IST

Agnipath Recruitment 2022, Agniveer Bharti Rally Notification: चार वर्षं नोकरी पूर्ण झाल्यानंतर, अग्निवीरांना सेवा निध‍ी पॅकेज, अग्निवीर स्किल सर्टिफिकेट आणि 12वी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.

भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांच्या भरतीसाठी भारतीय लष्कराने अग्निवीर रिक्रूटमेंट रॅली नोटिफिकेशन जारी केले आहे. यानुसार, पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन अर्ज करता येईल. जुलै 2022 पासून नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.

या पदांसाठी होईल भरती - अग्निवीर जनरल ड्यूटीअग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन/एम्‍यूनेशन)अग्निवीर क्‍लर्क/ स्‍टोअरकीपर टेक्निकलअग्निवीर ट्रेड्समन 10वी पासअग्निवीर ट्रेड्समन 8वी पास

किती असेल सॅलरी -जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, 4 वर्षांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल. यादरम्यान दरवर्षी 30 दिवस सुट्टीही मिळेल. सर्विसच्या पहिल्यावर्षी 30,000/- रुपये एवढे वेतन आणि भत्‍ते, दुसऱ्या वर्षी 33,000/- रुपये एवढे वेतन आणि भत्ते, तिसऱ्या वर्षी 36,500/- रुपये एवढे वेतन आणि भत्‍ते तसेच शेवटच्या आणि अखेरच्या वर्षीही 40,000/- हजार रुपये वेतन आणि भत्‍ते दिले जातील.

पदानुसार निर्धारित पात्रता -- जनरल ड्यूटी पदाच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना 10व्या वर्गात किमान 45 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. - टेक्निकल एव्हिएशन आणि एम्‍यूनेशन पदासाठी फिजिक्‍स, केमेस्‍ट्री, मॅथ्‍स आणि इंग्रजी विषयांत किमान 50 टक्के मार्कांसह 12वी पास होणे आवश्यक आहे.- क्‍लर्क/ स्‍टोअरकीपर पदांसाठी उमेदवार कुठल्याही शाखेतून किमान 60 टक्के मार्क घेऊन 12वी पास होणे आवश्यक आहे.  तसेच इंग्रजी आणि मॅथ्‍स मध्ये 50 टक्के मार्क असणे आवश्यक आहे.- ट्रेड्समन पदांसाठी 10वी आणि 8वी पास उमेदवारांची वेग-वेगळी भरती केली जाईल. सर्व विषयांत 33 टक्के मार्क असणे आवश्यक आहे. - सर्व पदांसाठी निर्धारित वयोमर्यादा 17.5 वर्ष ते 23 वर्ष एवढी असेल.

सर्व्हिसनंतर काय मिळणार? - चार वर्षं नोकरी पूर्ण झाल्यानंतर, अग्निवीरांना सेवा निध‍ी पॅकेज, अग्निवीर स्किल सर्टिफिकेट आणि 12वी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल. जो उमेदवार 10वी पास असेल, त्याला 4 वर्षांनंतर, 12वी समकक्ष पास सर्टिफिकेटदेखील मिळेल. यासंदर्भातील माहिती नंतर जारी केली जाईल. 

टॅग्स :Agneepath Schemeअग्निपथ योजनाIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकCentral Governmentकेंद्र सरकार