Job Alert: IDBI बँकेत नोकरीची संधी; 650 असिस्टंट मॅनेजर पदे भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 01:16 PM2021-08-11T13:16:45+5:302021-08-11T13:17:15+5:30

IDBI Bank job: बँकेत नोकरीची तयारी आणि संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. एकूण 650 जागांवर ही भरती केली जाणार आहे.

IDBI Bank Recruitment 2021: Job Opportunity in IDBI Bank; 650 Assistant Manager positions to be filled | Job Alert: IDBI बँकेत नोकरीची संधी; 650 असिस्टंट मॅनेजर पदे भरणार

Job Alert: IDBI बँकेत नोकरीची संधी; 650 असिस्टंट मॅनेजर पदे भरणार

googlenewsNext

Bank Jobs, IDBI Bank Recruitment 2021: इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI Bank) ने असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदासाठी भरती आयोजित केली आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवरून idbibank.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. 

(IDBI Bank Assistant Manager Recruitment 2021) बँकेतनोकरीची तयारी आणि संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. एकूण 650 जागांवर ही भरती केली जाणार आहे. अर्ज जमा करणे आणि अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 22 ऑगस्ट आहे. आयडीबीआय बँकेत भरती 2021 ची माहिती आणि नेटिफिकेशनची लिंक खाली देण्यात आली आहे. 

आयडीबीआय बँक भरती 2021 च्या महत्वाच्या तारखा...
आयडीबीआय बँक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात 10 ऑगस्ट 2021.
ऑनलाईन अप्लाय करण्याची अखेरची तारीख - 22 ऑगस्ट 2021.
 परीक्षा ओळखपत्र तारीख - 27 ऑगस्ट 2021
आयडीबीआय भरती परीक्षा - 4 सप्टेंबर 2021 (अंदाजे)

बँकेने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार मणिपाल (Manipal), बेंगलुरु (Bengaluru), निट्टे (Nitte), ग्रेटर नोएडा Greater Noida) च्या माध्यमातून आयडीबीआयच्या पीजीडीबीएफमध्ये केली जात आहे. यासाठी फायनान्समध्ये 1 वर्ष पोस्टग्रॅज्युएट (PG) डिप्लोमा,  पीजीडीबीएफकोर्स PGDBF course) च्या आधारे केली जाईल. या कोर्समध्ये कॅम्पसमध्ये 9 महिन्यांची क्लासरुम स्टडी आणि आयडीबीआय बँकेच्या ब्रांचमध्ये 3 महिन्यांची इंटर्नशीप दिली जाणार आहे. कोर्स पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ग्रेड ए सहाय्यक मॅनेजरच्या पदावर नियुक्त केले जाणार आहे. 

शैक्षणिक पात्रता
उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त विश्वविद्यालयातून कोणत्याही विषयात कमीतकमी 60 टक्के (एससी / एसटी / पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी 55%) मार्क मिळालेली पदवी असावी. उमेदवारांचा फायनल ईयर रिझल्ट 1 जुलै 2021 किंवा त्या आधी घोषित झालेला असला पाहिजे. 

वयाची अट (Age Limit)
अर्जदारांचे वय 21 वर्षे ते 28 वर्षे असायला हवे. अधिकच्या माहितीसाठी नोटिफिकेशन नीट वाचा...

अर्ज शुल्क (Application Fee)
अनूसूचित जाती, जमाती, पीडब्ल्यूडी तील अर्जदारांना अर्ज शुल्क 200 रुपये आहे. अन्य श्रेणीतील उमेदवारांना अर्जशुल्क 1000 रुपये आहे. 

IDBI बँक भरती नोटिफिकेशनसाठी इथे क्लिक करा...

Online Apply Link साठी इथे क्लिक करा...

 

Web Title: IDBI Bank Recruitment 2021: Job Opportunity in IDBI Bank; 650 Assistant Manager positions to be filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.