हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 16:10 IST2023-08-08T16:10:16+5:302023-08-08T16:10:38+5:30
HAL Apprentice Recruitment 2023: इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाइट- www.mhrdnats.gov.in आणि www.apprenticeshipindia.gov.in द्वारे अर्ज करू शकतात.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची संधी; अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती, असा करा अर्ज...
नवी दिल्ली : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) ग्रॅज्युएट अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि आयटीआय अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाइट- www.mhrdnats.gov.in आणि www.apprenticeshipindia.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ ऑगस्ट २०२३ आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील पदानुसार संबंधित क्षेत्रातील आयटीआय/बीबीए/डीएमएलटी/नर्सिंग/डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट आणि इतर विहित पात्रता असणे आवश्यक आहे.
एकूण जागांची माहिती
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये पदवीधर, डिप्लोमा धारक आणि आयटीआय पदवीधरांसह विविध हस्तकला आणि विषयांमधील अप्रेंटिस प्रशिक्षणासाठी ६४७ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिसच्या १८६ पदे, डिप्लोमा अप्रेंटिसच्या १११ पदे आणि आयटीआय अप्रेंटिसच्या ३५० पदांचा समावेश आहे.
वयोमर्यादा
एचएएल अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय ४० वर्षे ठेवण्यात आले आहे. भरती अधिसूचना २०२३ च्या नियमांनुसार वयात अतिरिक्त सूट दिली आहे.
अर्जाचे शुल्क
सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस, एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांना २५ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. ऑनलाइन, नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, वॉलेटद्वारे पेमेंट केले जाऊ शकते.
किती मिळेल वेतन?
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधील अप्रेंटिस पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार ८००० ते ९००० रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळेल.