GRSE Jobs 2022 : जीआरएसईमध्ये नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 17:06 IST2022-07-09T17:06:04+5:302022-07-09T17:06:38+5:30
GRSE Vacancy 2022: अर्ज करण्यासाठी उमेदवारांना गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडच्या अधिकृत साइट grse.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

GRSE Jobs 2022 : जीआरएसईमध्ये नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती, लगेच करा अर्ज
नवी दिल्ली : गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडने (Garden Reach Shipbuilders and Engineers Limited) एक भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडमध्ये 50 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार या पदांसाठी २८ जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडच्या अधिकृत साइट grse.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.
रिक्त जागा
पर्यवेक्षक: 32 पदे
इंजिन टेक्निशियन: 8 पदे
डिझाईन असिस्टंट: १७ पदे
एकूण: 57 पदे
शैक्षणिक पात्रता
या भरतीद्वारे विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. ज्यासाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा देखील भिन्न आहे. हे तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत साइटला भेट देऊ शकतात.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि 100 गुणांच्या ट्रेड टेस्टच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा कोलकाता आणि रांची येथे घेतली जाईल.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 400 रुपये भरावे लागतील. जर अर्जदारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) कोणत्याही शाखेत बँक चालान मोडद्वारे अर्जाचे शुल्क जमा केल्यास, 71 रुपयांचे बँक शुल्क लागू होईल. दुसरीकडे, SC/ST/PWBD/अंतर्गत उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
असा करा अर्ज
या भरतीसाठी उमेदवारांना 28 जुलैपूर्वी अधिकृत वेबसाइट grse.in वर जाऊन अर्ज करावा लागेल.