Government Jobs: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात बंपर भरती; अर्जासाठी अवघे दोन दिवस शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 07:14 PM2021-12-29T19:14:20+5:302021-12-29T19:15:58+5:30

राज्याच्या महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात (Department of Land Records Maharashtra) लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे.

government jobs maharashtra bhulekh recruitment 2021 government jobs in maharashtra | Government Jobs: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात बंपर भरती; अर्जासाठी अवघे दोन दिवस शिल्लक

Government Jobs: महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात बंपर भरती; अर्जासाठी अवघे दोन दिवस शिल्लक

googlenewsNext

मुंबई-

राज्याच्या महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागात (Department of Land Records Maharashtra) लवकरच भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. भूकरमापक तसंच लिपिक पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीनं अर्ज दाखल करता येणार आहे आणि ३१ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. एकूण १०१३ जागांसाठी बंपर भरती होणार आहे. 

भूकरमापक तथा लिपिक पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका शिक्षण पूर्ण केलेलं असणं गरजेचं असणार आहे. याशिवाय उमेदवाराला मराठी टायपिंग तसंच इंग्रजी टंकलेखन 40 wpm गती आवश्यक असणार आहे. भूकरमापक पदासाठी उमेदवाराचं वय १८ वर्षे ते ३८ वर्षे यादरम्यान असणार गरजेचं आहे. 

कोण-कोणत्या विभागात भरती
कोकण, पुणे, मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद या विभागांमध्ये भरती होणार आहे. 

३१ डिसेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारखी आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी आता शेवटचे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. 

कोण-कोणती कागदपत्रं लागणार
बायोडेटा, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगचं शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स), पासपोर्ट साइज फोटो

सविस्तर माहिती आणि अर्ज दाखल करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा-
https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/1035/Home 

Web Title: government jobs maharashtra bhulekh recruitment 2021 government jobs in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.