Income Tax Dept Recruitment 2021: आयकर विभागात काम करायचंय? दहावी पास, पदवीधरांना उत्तम संधी, जाणून घ्या प्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 20:13 IST2021-12-18T20:10:12+5:302021-12-18T20:13:30+5:30
Income Tax Dept Recruitment 2021: आयकर विभागात नोकरीच्या संधी; दहावी पास, ग्रॅज्युएट करू शकतात अर्ज

Income Tax Dept Recruitment 2021: आयकर विभागात काम करायचंय? दहावी पास, पदवीधरांना उत्तम संधी, जाणून घ्या प्रक्रिया
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे. आयकर विभागात नोकरीची संधी आहे. आयकर विभागातील टॅक्स असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफची पदं भरली जाणार आहेत. स्पोर्ट्स कोट्याच्या अंतर्गत यासाठी अर्ज करता येईल. यासाठी इच्छुक असलेले उमेदवार आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (incometaxindia.gov.in) जाऊन अर्ज करू शकतात. यासाठीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे.
इच्छुक उमेदवार https://www.incometaxindia.gov.in या लिंकवर जाऊनही अर्ज करू शकतात. याशिवाय या लिंकवर https://www.incometaxindia.gov.in/Pages/recruitment अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकतात. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण ७ पदं भरली जाणार आहेत. पाच टॅक्स असिस्टंट आणि दोन मल्टी टास्किंग पदं या माध्यमातून भरली जातील.
टॅक्स असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असायला हवी. यासोबत डेटा एंट्रीचा वेग ८००० डिप्रेशन प्रति तास असायला हवा. मल्टी टास्किंग पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त बोर्डाचं प्रमाणपत्र असायला हवं. टॅक्स असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी वयोमर्यादा १८ ते २७ वर्षे आहे. तर मल्टी टास्किंग पदासाठीची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे आहे.