DGCA Recruitment: १२ वी, पदवीधारकांसाठी 'डीजीसीए'मध्ये नोकरीची संधी; ७.१५ लाख पगार
By देवेश फडके | Updated: January 5, 2021 16:39 IST2021-01-05T16:34:06+5:302021-01-05T16:39:26+5:30
नागरी उड्डाण संचालनालयाकडून अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, महिन्याकाठी तब्बल ७.१५ लाख रुपये पगार मिळू शकतो.

DGCA Recruitment: १२ वी, पदवीधारकांसाठी 'डीजीसीए'मध्ये नोकरीची संधी; ७.१५ लाख पगार
नवी दिल्ली : नागरी उड्डाण संचालनालय यांच्याकडून अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना ७.१५ लाख रुपये प्रति महिना पगार मिळू शकतो. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येऊ शकणार आहे.
'डीजीसीए फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्ट रिक्रूटमेंट २०२१' असे या भरती प्रक्रियेचे नाव आहे. ०६ जानेवारी २०२१ पर्यंत 'डीजीसीए'च्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येऊ शकेल. 'डीजीसीए'मधील अनेकविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निर्धारित करण्यात आली आहे. असे असले तरी १२ वी, पदवीधारक किंवा पदव्युत्तर शिक्षण झालेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येऊ शकणार आहे.
'डीजीसीए'मध्ये डेप्युटी चीफ फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर (विमान) या पदासाठी ४ जागा, सीनियर फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर (विमान) या पदासाठी ५ जागा, फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर (विमान) या पदासाठी २३ जागा आणि फ्लाइट ऑपरेशन इन्स्पेक्टर (हेलिकॉप्टर) या पदासाठी ३ जागा अशा एकूण २६ जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून, या पदांसाठी अनुक्रमे ७ लाख १५ हजार, ६ लाख १३ हजार, ४ लाख २२ हजार आणि २ लाख ५० हजार प्रति महिना पगार असेल.
'डीजीसीए'मधील भरती प्रक्रियेत मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदांच्या अर्ज प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या पदासाठी गतवर्षीच्या नोव्हेंबर २०२० मधील शेवटची तारीख ठरवण्यात आली होती. मात्र, या भरती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आल्याचे समजते.