शहरं
Join us  
Trending Stories
1
'महानंद'चे अखेर NDDB कडे हस्तांतरण, पुन्हा रंगणार महाराष्ट्र-गुजरात राजकारण?
2
'तुमचा पक्ष चालवा ना, दुसऱ्यामध्ये कशाला तोंड घालता'; शरद पवारांचे मोजक्या शब्दात अजितदादांना प्रत्युत्तर
3
"मी शब्द पाळला, ७२ तासांसाठी सरकारमध्ये गेलो..."; अजित पवारांनी उघड केलं गुपित
4
अमेरिका भारतातील लोकसभा निवडणुकीत ढवळाढवळ करण्याच्या प्रयत्नात, रशियाचा सनसनाटी दावा
5
कोण आहेत संजीव गोएंका? कधीकाळी पुण्याच्या संघाचे मालक; आता KL Rahul वर संतापले
6
"१५ तास घ्या, तुम्हाला कोण घाबरतंय, आम्ही इथंच बसलो आहोत", असदुद्दीन ओवेसींचे नवनीत राणा यांना आव्हान
7
"अजितदादांचे माहिती नाही, मी ठाकरेंना चांगलं ओळखतो"; फडणवीसांचा खोचक टोला
8
Air India Express ची ७४ उड्डाणं रद्द; २५ कर्मचाऱ्यांची नोकरी गेली, बाकींना 'हा' अल्टिमेटम
9
'संपूर्ण बकवास...', सॅम पित्रोदा यांच्या चिनी-आफ्रिकन वक्तव्यावर रॉबर्ट वाड्रा संतापले
10
"मेरा बाप महागद्दार है..."; प्रियंका चतुर्वेदींच्या टीकेला शिवसेनेचं जशास तसं प्रत्युत्तर
11
४ जूननंतर एकनाथ शिंदे तुरुंगात जातील किंवा तडीपार होतील; संजय राऊतांचा इशारा
12
Smriti Irani : "हिंमत असेल तर भाऊ-बहिणीने..."; स्मृती इराणींचं राहुल-प्रियंका गांधींना खुलं आव्हान
13
मराठी चित्रपटाचा सातासमुद्रापार डंका, अमेरिकेत 'स्वरगंधर्व सुुधीर फडके'चे शो हाऊसफुल्ल!
14
भाईजानच्या सिनेमात श्रीवल्लीची एन्ट्री! सलमानच्या 'सिकंदर'ची हिरोईन बनणार रश्मिका मंदाना
15
अक्षय्य तृतीया: अन्नपूर्णा स्वरुपातील स्वामींचे करा स्मरण, मिळेल अक्षय्य पुण्यफल; कसे? पाहा
16
मोदींची प्रकृती बरी नाही, भाजपाने त्यांना प्रचारातून बाजूला करावं; संजय राऊतांचा टोला
17
Video - ज्या व्यक्तीला बेघर समजून चिमुकल्याने दिले सर्व पैसे तो निघाला अब्जाधीश अन् मग...
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे खर्च करतात आपला पगार?; मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली माहिती
20
AI लक्ष्मीकांत बेर्डेंचा अनुभव देऊ शकत नाही, लेक अभिनय बेर्डेने स्पष्टच सांगितलं

Career: हो! परीक्षा न देताही सरकारी नोकरी मिळवणे शक्य; वाचा नियम आणि अटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 12:32 PM

Government Job : सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न होऊ शकते साकार, फक्त हवी अचूक माहिती आणि फॉर्म वेळेत पाठवण्याची तत्परता!

सरकारी नोकरी मिळावी हे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण परीक्षा, निवडप्रक्रिया पाहता अनेक जण सरकारी नोकरीचा नाद सोडून देतात. मात्र अशाही काही सरकारी नोकऱ्या आहेत जिथे थेट भेटी गाठी करून नोकरी मिळवता येते, अशी संधी तुमच्याही वाट्याला आली तर तुम्ही ती सोडणार नाही हे नक्की!

सरकारी नोकरी शोधणे हे अवघड काम असले तरी ते अशक्य नाही. सरकारी नोकरी शोधण्यासाठी विद्यार्थी प्रिलिम्स, मुख्य परीक्षा आणि मुलाखती यासारख्या अनेक गोष्टी करतात. एवढी तयारी करूनही यश मिळतेच असे नाही. या परीक्षा देखील विद्यार्थ्यांसाठी खूप कठीण असतात, परंतु तुम्हाला माहिती आहे का की परीक्षा न देताही सरकारी नोकरी मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला पुढील संकेत स्थळांना भेट द्यायला हवी. 

>>सर्वप्रथम Mygov जॉब्स शोधा आणि Work at MyGov वर क्लिक करा.

>>येथे तुम्हाला भारत सरकारने जारी केलेल्या मॅनेजरपासून असिस्टंटपर्यंतच्या पदांची यादी मिळेल, याच्या मदतीने तुम्ही तुमची पात्र रिक्त जागा निवडू शकता. 

>>भारतीय न्यायालयांमध्ये टायपिस्टच्या पदांसाठी अर्ज करता येतो. यासाठी लेखी परीक्षा नसून टायपिंग टेस्ट आणि मुलाखत द्यावी लागेल.

>>यूपीएससीमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येतो. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही.

>>लेखी परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्यासाठी आयटीआय शिकाऊ पदासाठी अर्जही करता येतो. यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईनिंग केले जाते.

>>क्रीडा कोट्यातुनही  परीक्षा न देता सरकारी नोकरी मिळण्याचीही संधी आहे. भारतीय रेल्वे, भारतीय लष्कर आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका यांसारख्या संस्था ज्यांनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये चांगली कामगिरी केली आहे अशा लोकांसाठी सहाय्यक स्टेशन मास्टर आणि तिकीट कलेक्टर सारखी पदे राखीव ठेवतात.

>>संरक्षण मंत्रालयात अग्निशमन दलाच्या पदांवर भरतीसाठी अर्ज केले जाऊ शकतात. यंदा त्यासाठी 23 मे 2024 पर्यंत अर्ज करता येतील.

निती आयोग वेबसाइट

यासोबतच, तुम्हाला निती आयोगाच्या वेबसाइटवर रिक्त पदांच्या श्रेणीमध्ये अनेक पदे सापडतील, ज्यासाठी तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार अर्ज करू शकता. परीक्षा न देता NITI आयोगात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना NITI आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल. NITI आयोगाच्या आवश्यकतेनुसार, उमेदवारांच्या प्रोफाइलची प्रारंभिक स्क्रीनिंग आणि शॉर्टलिस्ट केल्यानंतर, काही उमेदवारांना पुढील निवड प्रक्रियेसाठी बोलावले जाते.

NITI आयोग नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यास स्वतंत्र आहे. उमेदवार अपात्र आढळल्यास किंवा खोटी माहिती, प्रमाणपत्र किंवा दस्तऐवज सादर केल्यास किंवा कोणतीही वस्तुस्थिती दडपल्यास, त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.

तसेच , तुम्ही BECIL च्या अधिकृत वेबसाइटला देखील भेट देऊ शकता, येथे तुम्हाला AIIMS, मंत्रालय आणि IIM सारख्या सरकारी विभागांमध्ये अर्ज करण्यासाठी रिक्त जागा मिळतील. Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) मध्ये परीक्षा न घेता सरकारी नोकरी मिळण्याची संधी आहे. BECIL वर्षभर अनेक पदांसाठी उमेदवारांची भरती करते.

BECIL मध्ये नोकरी मिळविण्यासाठी पुढील टप्पे लक्षात घ्या. 

  • BECIL becil.com च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • करिअर पेजवर क्लिक करा.
  • नोंदणी फॉर्मवर क्लिक करा.
  • अर्ज प्रक्रियेसह पुढे जा.
  • फॉर्म भरा, फी भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंट आउट घ्या.

या व्यतिरिक्तही सरकारी नोकरी संबंधित आणखी काही माहिती हवी असल्यास आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. 

टॅग्स :Career Guidanceकरिअर मार्गदर्शनgovernment jobs updateसरकारी नोकरी