शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

शिल्पकलेतही करिअरच्या नव्या संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 02:02 IST

शिल्पकला ही प्राचीन कालखंडापासून चालत आलेली कला आहे. आजही शिल्पकलेचे हे महत्त्व टिकून आहे. सेट डिझायनिंग आणि थ्रीडी अनिमेशन यांसारख्या करिअरच्या नव्या संधी शिल्पकलेला खुणावत आहेत.

शिल्पकला ही प्राचीन कालखंडापासून चालत आलेली कला आहे. आजही शिल्पकलेचे हे महत्त्व टिकून आहे. सेट डिझायनिंग आणि थ्रीडी अनिमेशन यांसारख्या करिअरच्या नव्या संधी शिल्पकलेला खुणावत आहेत. त्यामुळे या कलाक्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी आहेत.शिल्पकला क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. पूर्वी पारंपरिक पद्धतीने शिल्पकलेचे शिक्षण दिले जात असे. शिल्पकलेच्या अभ्यासामध्ये शिल्पकलेचा इतिहास, शरीरशास्त्राचा अभ्यास (अवयवांची प्रमाणबद्धता), नैसर्गिक व मानवनिर्मित डिझाइन बनवणे, सृजनशील शिल्पे तयार करणे, तसेच व्यक्तिशिल्प, स्मारकशिल्प आदी विषयांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे, विविध माध्यमे वापरून शिल्प बनविण्याचे प्रशिक्षणही दिले जाते. यात माती, प्लास्टर आॅफ पॅरिस, सिपोरेक्स, दगड, धातू, फायबर ग्लास, संमिश्र माध्यमे (लेदर, अ‍ॅक्रलिक व अन्य माध्यमांचा एकत्रित उपयोग करून निर्मिती करणे) आदींचा समावेश असतो. सौंदर्यशास्त्राचादेखील या अभ्यासक्रमामध्ये समावेश केलेला आहे. दहावीनंतर एक वर्षाचा फाउंडेशन अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, या अभ्यासक्रमात प्रवेश घेता येतो. यासाठी चित्रकलेची इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून, फाउंडेशनच्या गुणांवरून प्रवेश दिला जातो.इंटेरिअरसाठी होतोय शिल्पांचा वापरकाही वर्षांपूर्वी शिल्पकारांना केवळ व्यक्तिगत कामे मिळत असत (म्हणजे साधारणत: पुतळा बनविण्याची वगैरे), परंतु अलीकडे नवश्रीमंत वर्गामध्ये, तसेच कॉर्पोरेटमधून आॅफिसमध्ये शिल्पांचा इंटेरिअरसाठी वापर केला जातो. याबरोबरच चौकातील शिल्प, तसेच स्मारकशिल्पे यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. चित्रपटाच्या सेट डिझायनिंगमध्ये, तसेच स्टुडिओमध्येसुद्धा चांगल्या संधी उपलब्ध आहेत.शोरूम्स व मॉल्समध्येदेखील शिल्पांना चांगली मागणी आहे, तसेच स्मारक शिल्पे यांनासुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. सिनेमाच्या सेट डिझायनिंग आणि स्टुडिओमध्येसुद्धा चांगल्या संधी उपलब्ध आहेत. शोरूम्स आणि मॉल्समध्येही शिल्पांना चांगली मागणी आहे. थ्रीडी अ‍ॅनिमेशनमध्ये पात्रांना तयार करण्यासाठी शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. यामुळे अ‍ॅनिमेशन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ अलीकडे शिल्पकलेकडे वाढला आहे.थ्रीडी अ‍ॅनिमेशनमध्ये शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे. थ्रीडी अ‍ॅनिमेशनमध्ये पात्रांना तयार करण्यासाठी या विद्यार्थ्यांची आवश्यकता असते. यामुळे अ‍ॅनिमेशन शिकणाºया विद्यार्थ्यांचा ओढा अलीकडे शिल्पकलेकडे वाढला आहे. शिल्पकला हे टीमवर्क आहे. यामुळे अगदी पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनादेखील आज काम मिळत आहेत.गणपती वा देवीच्या मूर्ती बनविण्यासाठी शिल्पकलेचा अभ्यास उपयोगी पडत असला, तरी तो केलाच पाहिजे अशी आवश्यकता नसते. शिल्पकलेचा खूपच कमी वापर या व्यवसायात केला जातो. साच्यातून एकसारख्या मूर्ती घडवायच्या असल्याने, अनुभवाच्या जोरावर हे काम करता येते. रंगाच्या नवीन तंत्रामुळे रंग देण्याचे कामही अधिकच सोपे झाले आहे. एकूण या व्यवसायामध्ये पारंपरिक व अनुभवाने शिक्षण घेतलेलीच मंडळी अधिक असतात. विविध कामांसाठी डाय तयार करणे, ट्रॉफीज, तसेच पदके तयार करण्यासाठी टांकसाळीत नाणी बनविण्यासाठीदेखील शिल्पकलेचा उपयोग होतो. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रnewsबातम्या