Career in 'Automatometry' | ‘आॅप्टोमेट्री’त करा करिअर

‘आॅप्टोमेट्री’त करा करिअर

‘तेरी आँखो के सीवा दुनिया में रखा क्या है...’ एखाद्याच्या डोळ्यांचे जितके वर्णन करावे तितके त्यासाठी कमीच असते. कारण डोळ्यांचे मानवी आयुष्यात महत्त्वच तितके आहे. खरेतर, डोळे हा मानवाच्या अवयवांतील सर्वांत नाजूक भाग आहे. अर्थात डोळ्यांची काळजी घेण्याचे काम आॅप्टोमेट्रीस्ट करत असतो. यासाठी त्याला विशेष प्रशिक्षणही दिले जाते. डोळ्यांचे परीक्षण, रोग निदान आणि उपचारासंबंधी आॅप्टोमेट्रीस्ट साहाय्य करतो. देशात अंध लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अन्य लाखो लोक डोळ्यांच्या समस्येने पीडित आहेत. बऱ्याचदा डोळ्यांच्या आजारावर योग्य सल्ला आणि वेळेत उपचार न मिळाल्याने अचानक अंधत्व आलेले अनेक लोक आपण पाहतो. खरेतर, त्यांना वेळेत योग्य सल्ला आणि मार्गदर्शन मिळाले असते, तर कदाचित त्यांचे डोळे वाचूही शकले असते. आॅप्टोमेट्रीस्ट हे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मानव कल्याण कार्यात या क्षेत्राद्वारे योगदान देता येईल. या क्षेत्रातील कार्यरत लोकांना अनेक मानसन्मानही मिळतात.
आॅप्टोमेट्रीस्ट बनण्यासाठी आॅप्टोमेट्री या विषयात पदवी अथवा पदविका कोर्स करणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बारावी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयांतून ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावे लागते. क्लिनिकल आॅप्टोमेट्री या विषयात पदविका (डिप्लोमा) कोर्स केला असल्यास पदवीच्या तिसºया वर्षात प्रवेश मिळू शकतो. डिप्लोमा कोर्स दोन वर्षे आणि डीग्रीचा (बीएस्सी इन आॅप्टोमेट्री) कालावधी चार वर्षे असतो. पदवी कालावधीत तीन वर्षे पाठ्यक्रम आणि एक वर्ष आंतरवासिता करावी लागते. आंतरवासितादरम्यान विद्यार्थ्यास क्लिनिक अथवा हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या तज्ज्ञांकडे काम करावे लागते. या अभ्यासक्रमास आयसीईटी परीक्षेनंतर प्रवेश दिला जातो.
आॅप्टोमेट्रीस्ट किंवा आॅप्टोमेट्रीक फिजिशियन डोळ्यांची देखभाल किंवा तपासणी करणाºया यंत्रसामग्रीसंबंधी तज्ज्ञ असतात. आॅप्टोमेट्रीस्ट हे डोळ्यांची तपासणी करून चष्मा किंवा लेन्सबाबत मार्गदर्शन करतात. आॅप्टोमेट्रीस्ट हे सर्जरी अथवा कोणतीही मोठी शस्त्रक्रिया करीत नाहीत. आॅप्टीकल उपकरणांच्या साहाय्याने ते चिकित्सा करतात. उदा. दृष्टीदोष, रंगआंधळेपणा, जवळचे, लांबचे दिसण्यासंबंधीचे दोष, आनुवंशिक डोळ्यांच्या समस्या या बाबींवर ते काम करतात. डोळ्यांची तपासणी करून ते चष्मा किंवा लेन्सही बनवून देतात.


मोठ्या संधी : हा कोर्स पूर्ण केल्यानंतर अनेक संधी आॅप्टोमेट्रीस्टकडे उपलब्ध असतात. डोळे तपासणीचे क्लिनिक तो काढू शकतो किंवा आॅप्टीकल लेन्सनिर्मिती युनिटही सुरू करता येईल तसेच कॉन्टॅक्ट लेन्स किंवा आॅप्थेल्मिक लेन्स इंडस्ट्रीत विविध विभागांत त्याला नोकरी मिळू शकते. अनेक हॉस्पिटलच्या नेत्र विभागातही संधी उपलब्ध असतात. कॉर्पोरेट क्षेत्रात डोळ्यांसंबंधी उपकरणे बनविणाºया कंपन्यांत या क्षेत्रातील कुशल लोकांची गरज भासते. डोळ्यांच्या डॉक्टरांकडे साहाय्यक म्हणूनही काम मिळेल. आता शासकीय नियमानुसार आॅप्टीकल दुकानात प्रशिक्षित व्यक्तीच काम करू शकतात, त्यामुळे कामाच्या अपार संधी या क्षेत्रात आहेत असे म्हणायला हरकत नाही.

Web Title: Career in 'Automatometry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.