शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

चुका गुगलनं केल्या, पण कोट्यधीश बनला भारतीय तरुण! तुम्हीही होऊ शकता वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:45 IST

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी Google हा सर्वात चांगला मार्ग आहे असं आपण सहज म्हणतो. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर तो गुगलच्या माध्यमातून कोणतीही माहिती सहज मिळवू शकतो.

कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी Google हा सर्वात चांगला मार्ग आहे असं आपण सहज म्हणतो. एखाद्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर तो गुगलच्या माध्यमातून कोणतीही माहिती सहज मिळवू शकतो. पण गुगलमध्येही अनेक चुका आहेत आणि याचा खुलासा इंदूरमध्ये राहणाऱ्या अमन पांडे या तरुणानं केला आहे. अमन पांडे मूळचा झारखंडचा आहे. त्याचे शालेय शिक्षण झारखंडमधून झालं आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी तो एनआयटी भोपाळमध्ये आला.

अमन पांडे यानं एनआयटीमधून बीटेकचं शिक्षण पूर्ण केलं आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, स्वतःचं स्टार्टअपचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तो इंदूरमध्ये राहू लागला. यादरम्यान त्यानं इंदूरमध्ये 'बग्स मिरर' नावाची कंपनी सुरू केली. मात्र, सुरुवातीच्या काळात त्यानं गुगलच्या ३०० हून अधिक चुका काढल्या आणि त्या सांगितल्या. गुगलला त्यांच्या चुका कळल्यावर अमन पांडे याला बक्षीस म्हणून कोट्यवधी रुपये दिले. आता इथवरच अमन पांडे थांबला नाही. 

गुगलला मोबाइल फोनमधील चुका सांगितल्यागुगल येत्या काही दिवसात आपला नवीन अँड्रॉइड फोन 'गुगल 13' लॉन्च करणार आहे. Google ने 'Google 13' मोबाईलमध्ये खूप मेहनत घेतली आहे जेणेकरून या फोनमध्ये कोणत्याही चुका होऊ नयेत आणि तो इतर मोबाईल फोनपेक्षा चांगला ठरवा. पण अमन पांडे यानं नव्या अँड्रॉइड फोन गुगल 13 मधील अनेक चुकाही गुगलच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानं गुगलच्या अँड्रॉईड फोनमधील तब्बल ४९ चुका सांगितल्या. या अशा चुका आहेत ज्यामुळे कोणतीही व्यक्ती गुगलचा नुकताच लॉन्च झालेला मोबाईल फोन सहज हॅक करू शकते आणि संबंधित व्यक्तीला वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जाऊ शकतो.

गुगलनं अमन पांडेला दिलं कोट्यवधींचं बक्षीसगुगलनं आपल्या नवीन लाँच केलेल्या फोनमध्ये ४९ प्रकारच्या चुकांची माहिती समोर आल्यावर पुन्हा एकदा गुगलने अमन पांडेला कोट्यवधी रुपयांचं बक्षीस दिलं आहे. त्याच बरोबर अमन पांडे हा वेगवेगळ्या वेबसाईट्सच्या चुकांची माहिती त्या वेबसाईट्सना सतत देत असतो आणि त्याच्या कंपनीत आता १५ तरुण त्याच पद्धतीनं काम करत आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारच्या चुका पकडून संबंधित कंपनीला माहिती देण्याचं काम करतात.

त्याचं काम पाहता अनेक कंपन्यांनी त्याच्याशी डील केली आहे. "लहानपणापासूनच काहीतरी वेगळं काम करावं, असा विचार सतत डोक्यात असायचा आणि त्याचाच परिणाम म्हणून गुगलसारख्या मोठ्या कंपनीला त्यांच्या विविध प्रकारच्या चुकांची माहिती देऊ शकलो", असं अमन पांडे सांगतो. 

टॅग्स :googleगुगलindore-pcइंदौर