BSNL मध्ये नोकरीची संधी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात भरती प्रक्रिया; शेवटची तारीख काय? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 04:41 PM2021-12-16T16:41:50+5:302021-12-16T16:43:14+5:30

BSNL तर्फे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात भरती केली जात आहे. जाणून घ्या, डिटेल्स...

bsnl recruitment 2021 job various posts vacant of diploma apprentice know all details | BSNL मध्ये नोकरीची संधी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात भरती प्रक्रिया; शेवटची तारीख काय? पाहा

BSNL मध्ये नोकरीची संधी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात भरती प्रक्रिया; शेवटची तारीख काय? पाहा

Next

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सरकारच्या विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यातच आता भारत संचार निगम लिमिटेड (Bharat Sanchar Nigam Limited) महाराष्ट्र येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. 

बीएसएनएलच्या वेबसाइटवर जारी करण्यात आलेल्या नोटिफिकेशनमध्ये पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला असून, ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. बीएसएनएलतर्फे एकूण ५५ जागांसाठी भरती होणार असून डिप्लोमा अप्रेंटिसची पदे भरली जाणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

इच्छुक असलेल्या उमेदवारांना २९ डिसेंबरपर्यंत अर्ज पाठवता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. बीएसएनएलतर्फे राबवण्यात येत असलेली भरती प्रक्रिया अमरावती, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, नाशिक, गोवा, पुणे, सातारा, सोलापूर,नागपूर , अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती होणार आहे. अप्रेंटिस प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षाचा आहे.

दरम्यान, पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे AICTE ने मान्यता दिलेल्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलं असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंग किंवा टेक्नोलॉजीमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासोबतच इलेक्ट्रॉनिक्स, ई अॅण्ड टीएस, कॉम्प्युटर, आयटी यापैकी एका ब्रांचेसमध्ये डिप्लोमा असणे अनिवार्य आहे. निवड झालेल्या उमेदवारांना अप्रेंटिस कायदा १९६१ नुसार स्टायपेंड दिला जाईल. डिप्लोमामध्ये मिळवलेली अंतिम टक्केवारी आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 

Web Title: bsnl recruitment 2021 job various posts vacant of diploma apprentice know all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.