BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:13 IST2025-07-16T19:12:47+5:302025-07-16T19:13:05+5:30
BHEL Artisan Recruitment 2025: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली.

BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणजेच भेलने विविध पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली. पात्र उमेदवार भेलच्या अधिकृत वेबसाइट careers.bhel.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेत संस्थेतील ५१५ पदे भरली जातील.
या भरतीअंतर्गत फिटर- १७६ जागा, वेल्डर- ९७ जागा, टर्नर- ५१ जागा, मशिनिस्ट- १०४ जागा, इलेक्ट्रिशयन- ६५ जागा, इलेक्ट्रिक मेकॅनिक- १८ जागा आणि फाउंड्री मॅनच्या ४ जागा भरल्या जाणार आहेत. आजपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवार १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती: वय
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांचे कमाल वय २७ वर्षे, ओबीसी उमेदवारांचे कमाल वय ३० वर्षे आणि एसटी/एसटी उमेदवारांचे कमाल वय ३२ वर्षे असावे. एसटी आणि एसटी उमेदावांराना वयोमार्यादेत पाच वर्षांची सूट दिली. तर, ओबीसी उमेदवारांना वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट देण्यात आली.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती: पात्रता
उमेदवाराने भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवारांकडे राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र किंवा आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सामान्य आणि ओबीसी उमेदवारांनी दहावी आणि आयटीआयमध्ये किमान ६० टक्के गुण मिळवलेले असावेत, तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी किमान ५५ टक्के गुण मिळवलेले असावेत.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती: निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवाराची लेखी परीक्षा घेतली जाईल आणि दुसऱ्या टप्प्यात कौशल्य चाचणी आणि कागदपत्र पडताळणी होईल. लेखी परीक्षेत उमेदवारांना १०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. या परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी आमंत्रित केले जाईल.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती: अर्ज शुल्क
सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांकडून परीक्षा शुल्क म्हणून ६०० रुपये आणि प्रक्रिया शुल्क म्हणून ४०० रुपये आकारले जातील. याशिवाय, अनुसूचित जाती आणि जमाती आणि दिव्यांग उमेदवारांना परीक्षा शुल्कात सूट देण्यात आली आहे. परंतु, त्यांना प्रक्रिया शुल्क म्हणून ४०० रुपये द्यावे लागणार आहेत.