Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 18:25 IST2025-07-25T18:20:49+5:302025-07-25T18:25:26+5:30

Bank of Baroda Recruitment: बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे.

Bank of Baroda is recruiting for the posts of Manager, Senior Manager; Don't miss the opportunity! | Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!

Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!

बँकेतनोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध विविध विभागांमध्ये व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक अशा उच्च पदांसाठी अर्ज मागवले आहेत.या भरतीची अधिसूचना बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर प्रसिद्ध करण्यात आली. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. 

बँक ऑफ बडोदाने डिजिटल बँकिंग, सुरक्षा, माहिती सुरक्षा आणि माहिती तंत्रज्ञान विभागात विविध पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली. या भरती अंतर्गत मॅनेजर- डिजिटल प्रोडक्ट (जागा -०७), सीनियर मॅनेजर- डिजिटल प्रोडक्ट (जागा-०६) , फायर सेफ्टी ऑफिसर (जागा- १४), मॅनेजर-इनफॉर्मेशन सिक्योरिटी (जागा- ०४), सीनियर मॅनेजर-इनफॉर्मेशन सिक्योरिटी (जागा- ०२), मॅनेजर- स्टोरेज एडमिनिस्ट्रेशन सिक्योरिटी (जागा- ०२) आणि सीनियर मॅनेजर-स्टोरेज एडमिनिस्टेशन अँड बॅकअप पदांसाठी दोन जागा भरल्या जाणार आहेत.

बँक ऑफ बडोदा भरती २०२५: पात्रता
मॅनेजर, सिनियर मॅनेजर या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे फुल टाइम बीई/बीटेक कॉम्प्युटर सायन्स अॅप्लिकेशन्स/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन किंवा एमसीए पदवी असणे आवश्यक आहे. मॅनेजर पदासाठी संबंधित क्षेत्रात ३ वर्षांचा आणि सिनियर मॅनेजरसाठी ०६ वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. फायर सेफ्टी ऑफिसर पदासाठी बीई/पदवी/अग्निशमन अभियांत्रिकी पदवी/पदवीधर पदवी इत्यादी आणि १ वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. त्याचप्रमाणे, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता मागवण्यात आल्या आहेत.

बँक ऑफ बडोदा भरती २०२५: वय आणि अर्ज शुल्क
पदानुसार किमान वय २२-३० वर्षे आणि कमाल वय ३४-४० वर्षे निश्चित करण्यात आले. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.

बँक ऑफ बडोदा भरती २०२५: अर्ज शुल्क
सामान्य/ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांना ८५० रुपये आणि एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/ईएसएम/डीईएसएम/महिला उमेदवारांकडून १७५ रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. भरती संदर्भात अधिक माहिती बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

Web Title: Bank of Baroda is recruiting for the posts of Manager, Senior Manager; Don't miss the opportunity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.