यशाचा वारसा! २०२६ बॅचसाठी VIT कडून १०,००० प्लेसमेंट ऑफर्स, १ कोटीचं सर्वोच्च पॅकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2026 17:48 IST2026-03-18T17:47:34+5:302026-03-18T17:48:54+5:30

वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) ने उच्च शिक्षणातील उत्कृष्टतेची व्याख्या नेमकी काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.

A Legacy of Success: VIT Surpasses 10,000 Placement Offers for the 2026 Batch | यशाचा वारसा! २०२६ बॅचसाठी VIT कडून १०,००० प्लेसमेंट ऑफर्स, १ कोटीचं सर्वोच्च पॅकेज

यशाचा वारसा! २०२६ बॅचसाठी VIT कडून १०,००० प्लेसमेंट ऑफर्स, १ कोटीचं सर्वोच्च पॅकेज

वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) ने उच्च शिक्षणातील उत्कृष्टतेची व्याख्या नेमकी काय असते हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. २०२६ च्या बॅचसाठी १०,००० हून अधिक प्लेसमेंट ऑफर्स मिळवून संस्थेने एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे चौथ्यांदा असा पराक्रम करून VIT ने कॅम्पस रिक्रूटमेंटमधील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

लेटेस्ट प्लेसमेंट आकडेवारीवरून असं दिसून येतं की, जिथे शैक्षणिक दर्जा आणि उद्योगांची मागणी यांचा मेळ असतो, तिथे यशाची खात्री हमखास असते. आतापर्यंत ७०१ कंपन्यांकडून १०,०७१ ऑफर्स मिळाल्या असून ही भरती प्रक्रिया अजूनही जोमाने सुरूच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे १ कोटीचं सर्वोच्च वार्षिक पॅकेज, जे VIT च्या विद्यार्थ्यांची जागतिक स्तरावरील स्पर्धात्मकता दर्शवतं.

मार्की (Marquee) ऑफर्स : ६९६ (२० लाख प्रति वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पॅकेज).

सुपर ड्रीम ऑफर्स : २,२९२ (१० लाख प्रति वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पॅकेज).

ड्रीम ऑफर्स : ३,३३३ (६ लाख प्रति वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त पॅकेज).

या आकडेवारीमध्ये इंटर्नशिप आणि फुल टाईम प्लेसमेंट अशा दोन्हीचा समावेश आहे. प्रसिद्ध कॉर्पोरेट कंपन्यांसोबत असलेली VIT ची यशस्वी पार्टनरशिप यातून स्पष्ट होते. उद्योगांसाठी सज्ज असणारे पदवीधर घडवून, VIT शिक्षण आणि रोजगार यांच्यातील दरी सातत्याने कमी करत आहे. २०२६ च्या बॅचसाठी भविष्य केवळ उज्ज्वलच नाही, तर अत्यंत सुरक्षितही दिसत आहे.

Web Title : वीआईटी की प्लेसमेंट विरासत: 2026 बैच के लिए 10,000 ऑफर और ₹1 करोड़ का पैकेज

Web Summary : वीआईटी ने 2026 बैच के लिए 10,000 से अधिक प्रस्तावों के साथ प्लेसमेंट का मील का पत्थर हासिल किया। उच्चतम पैकेज ₹1 करोड़ है, जो छात्रों की वैश्विक प्रतिस्पर्धात्मकता को उजागर करता है। वीआईटी की उद्योग भागीदारी शिक्षा-रोजगार के अंतर को पाटती है, जिससे स्नातकों का भविष्य उज्ज्वल होता है।

Web Title : VIT's Placement Legacy: 10,000 Offers & ₹1 Crore Package for 2026 Batch

Web Summary : VIT achieves placement milestone with 10,000+ offers for the 2026 batch. The highest package is ₹1 crore, highlighting students' global competitiveness. VIT's industry partnerships bridge the education-employment gap, ensuring a bright future for graduates.