सावध गुंतवणुकीपासून ठोस मालमत्तेकडे : निश्चित उत्पन्नधारकांचा भूखंडांकडे वाढता कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 15:19 IST2026-04-09T15:18:50+5:302026-04-09T15:19:54+5:30
श्री. पांगूळ यांनी आयुष्यभर परिश्रमपूर्वक बचत केली. एफडी, पीपीएफ आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांमध्ये पैसे गुंतवले. मित्रांनी भूखंड खरेदीचा सल्ला दिला की त्यांचा नम्र पण ठाम नकार ठरलेलाच. यात त्यांना जोखीम वाटायची. मात्र...

सावध गुंतवणुकीपासून ठोस मालमत्तेकडे : निश्चित उत्पन्नधारकांचा भूखंडांकडे वाढता कल
>> नीरज शाह
मुख्य विपणन अधिकारी, लोक8 इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड
जोखीम टाळण्याच्या धडपडीत अनेक स्वप्ने अपूर्ण राहतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर जपून पावले टाकताना कधी कधी स्वप्नांची वाटच चुकते. भंडाऱ्याचे सेवानिवृत्त प्राचार्य पांगूळ यांची कथा याचाच प्रत्यय देणारी आहे. आयुष्यभर त्यांनी परिश्रमपूर्वक बचत केली. एफडी, पीपीएफ आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांमध्ये पैसे गुंतवले. मित्रांनी भूखंड खरेदीचा सल्ला दिला की त्यांचा नम्र पण ठाम नकार ठरलेलाच. यात त्यांना जोखीम वाटायची.
विकासक पसार झाला तर? परिसराचा विकासच झाला नाही तर?" असे प्रश्न ते उलट विचारायचे आणि ते एकटे नव्हते. देशभरातील असंख्य जबाबदार कमावते लोक जमिनीच्या वाढत्या किमती पाहत होते, पण स्वतः मात्र बाजूला राहिले. परवडत नव्हते म्हणून नाही, तर एक चुकीचा निर्णय अनेक वर्षांची जपून केलेली बचत धोक्यात आणू शकतो, या भीतीने. कारण अर्धवट प्रकल्प राहिल्याच्या, यातील फसवणुकीच्या कथा त्यांनी ऐकल्या होत्या आणि या कथा खोट्याही नव्हत्या. श्री. पांगूळही त्याच सावलीत उभे होते. पण मग दोन घटना घडल्या आणि त्यांचा दृष्टिकोन बदलू लागला.
...अन् लोक8 ब्रुकसाईड साइट बघून घेतला निर्णय
१. विदेशातील एका अभ्यासदौऱ्यात पांगूळ यांनी नियोजनबद्ध वसाहती प्रत्यक्ष पाहिल्या. मजबूत पायाभूत सुविधा, शिस्तबद्ध विकास आणि दीर्घकालीन मूल्यनिर्मिती. चांगले नियोजन कसे असते, याची त्यांना स्पष्ट जाणीव झाली. यानंतर वृत्तपत्रातील जाहिरातीमुळे दक्षिण नागपूरच्या खरसौली येथे लोकमत समूहाच्या लोक8 ब्रुकसाईड लाइफस्टाइल प्लॉटिंग प्रकल्पाला भेट देण्याची संधी त्यांना मिळाली. यानंतर वृत्तपत्रातील जाहिरात वाचून त्यांनी दक्षिण नागपुरातील खरमोली येथे लोक8 ब्रुकसाईड लाइफस्टाईल भूखंडांच्या साईटला भेट दिली. आधी अनेक प्रकल्पाठिकाणी दिसला तसा एक पडीक जमिनीचा एक तुकडा आपल्या दाखवला जाईल.

२. आधीसारखीच मोठमोठी पोकळ आश्वासने मिळतील, अशी अपेक्षा त्यांना होती पण प्रत्यक्षात लोक8 ब्रुकसाईड साइट बघून ते आश्चर्यचकित झाले. प्रशस्त पक्के रस्ते, पथदिवे आणि नियोजनबद्ध प्लॉटिंग पाहून ते अवाक् झालेत. ब्रुकसाईट पाहून त्यांना विदेशातले प्रकल्प आठवले. ही संधी सोडायला नको, अशा त्यांच्या पत्नीही कुजबुजल्या. आधी पाहिलेल्या अनेक साईट आणि ब्रुकसाईड साईट यात जमीन अस्मानाचा फरक होता. या साईट व्हिजिटनंतर त्यांची द्विधावस्था संपली. "आम्ही लोक8 ब्रुकसाईडची निवड केली. या प्रकल्पासोबत जुळलेल्या लोकमतच्या नावाने आम्हाला विश्वास दिला. आम्हाला या प्रकल्पातील गुंतवणुकीने मोठा आधार दिला", असे ते आज मोठ्या अभिमानाने सांगतात.
खरा मुद्दा: बेसा-पिपळा-खरसोलीत उभा राहतोय नवा विश्वास
नागपूरमध्ये, विशेषतः बेला-पिपळा-खरसोली भागात बदल दिसू लागले आहेत. शाळा, रस्ते, बाजार अशा सुविधा हळूहळू उभ्या राहत आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी परवडणे हा मुख्य प्रश्न नसतो. मुख्य प्रश्न असतो, विश्वासाचा, विकासक विश्वासार्ह आहे का? ही जागा रिटर्न देणार का? काम वेळेत पूर्ण होईल का? दक्षिण नागपूरच्या या वाढत्या भागात आता उत्तरं बोलण्यापेक्षा कृतीत दिसू लागली आहेत. फक्त आश्वासने नाहीत, तर प्रत्यक्ष तयार होत असलेल्या सुविधा आहेत, ज्या लोक पाहू शकतात आणि अनुभवू शकतात. आज नागपूरमध्ये, विशेषतः बेला-पिपळा-खरसोली कॉरिडॉरमध्ये, पायाभूत सुविधांचा विस्तार होत आहे. संपत्ती फटाक्यांच्या आतषबाजीसारखी गाजावाजा करत येत नाही. ती साध्या, सातत्यपूर्ण आणि अनेकदा निरर्थक वाटणाऱ्या निर्णयांमधून हळूहळू साचत जाते.
संयमी बचतधारकांसाठी भूखंड का ठरतोय उपयुक्त ?
शेअर बाजारातील चढउतारांच्या तुलनेत हे गणित शांत आहे, पण प्रभावी आहे. १०-१५ लाखांच्या बचतीतून ५०-६० लाख किमतीच्या भूखंडात गुंतवणूक करू शकता. सुरुवातीला काही रक्कम भरायची आणि उरलेली रक्कम हप्त्यांमध्ये द्यायची. पण वाढणाऱ्या किमतीचा फायदा संपूर्ण भूखंडाच्या मूल्यावर मिळतो. रोज दर पाहण्याची गरज नाही. घाईत विक्री करण्याचा प्रश्न नाही. हळूहळू, स्थिरपणे संपत्ती वाढत जाते. ज्यांना लगेच पैसे काढता येत नाहीत म्हणून भीती वाटते, त्यांच्यासाठी हे अडथळा असू शकते. पण शिस्तबद्ध कुटुंबांसाठी हीच सुरक्षितता असते. कारण सहज पैसे काढता येत नाहीत, त्यामुळे बचत टिकून राहते. दरमहा भरलेले हप्ते म्हणजे सक्तीची बचत. हे फार रोमांचक वाटणार नाही. पण खरी संपत्ती अशीच तयार होते. शांतपणे सातत्याने.