गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

By Admin | Updated: March 13, 2016 02:06 IST2016-03-13T02:06:24+5:302016-03-13T02:06:24+5:30

संग्रामपूर तालुक्यातील घटना; दारूच्या व्यसनातून पती-पत्नीत होत होते वाद.

Youth's suicide takes place with a lethal | गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

संग्रामपूर (बुलडाणा) : तालुक्यातील पळशी झांशी येथील ३२ वर्षीय तरूणाने दारूच्या व्यसनातून व पती-पत्नीत वाद होत असल्याकारणाने, पत्नीसोबत राहत नसल्यामुळे, कौटुंबिक कारणामुळे स्वत:च्या राहत्या घरात लोखंडी टिनाच्या अँगलला दोरी बांधून दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ११ मार्चच्या रात्री दीड वाजेदरम्यान पळशी झांशी येथे उघडकीस आली. एकनाथ विश्‍वनाथ चितोडे (वय ३२) या तरूणाने आपल्या स्वत:च्या राहत्या घरात टिनाचे लोखंडी अँगलला दोरी बांधुन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची फिर्याद मृताचा भाऊ सुपडा विश्‍वनाथ चितोडे याने तामगाव पोलिसात दिली असून, याप्रकरणी तामगाव पोलिसांनी १७४ जा.फौ. नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Youth's suicide takes place with a lethal