तरुणाची आत्महत्या

By Admin | Updated: June 22, 2017 04:27 IST2017-06-22T04:27:17+5:302017-06-22T04:27:17+5:30

लोणार तालुक्यातील शारा येथील घटना.

The youth's suicide | तरुणाची आत्महत्या

तरुणाची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : तालुक्यातील शारा येथील एका ३५ वर्षीय तरुणाने घरातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २१ जून रोजी उघडकीस आली.
शारा येथील रामा भगवान कांबळे (३५) याने घरातील अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २0 जून रोजी रात्रीदरम्यान घडली. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या तरुणाने आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे समजते. त्याच्या पश्‍चात तीन मुले असून, तो मजुरी काम करीत होता. याप्रकरणी जा.फौ. कलम १७४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय उकंडा राठोड व पोकॉ. रामेश्‍वर गीते हे करीत आहेत.

Web Title: The youth's suicide