दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू
By Ram.deshpande | Updated: July 26, 2017 01:44 IST2017-07-26T01:44:05+5:302017-07-26T01:44:16+5:30

दुचाकीच्या अपघातात युवकाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील कोºहाळा बाजार येथील युवकाचा २५ जुलै रोजी लालमातीजवळ दुचाकी अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर अपघात हा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने झाला आहे.
संतोष रामभाऊ गायकवाड (२८ वर्षे) कोºहाळा बाजार येथील रहिवासी आहे. सदर युवक कोºहाळा बाजार येथून वाघजाळ फाट्याच्या दिशेने होण्डा शाइन या दुचाकी गाडीने जात होता. लालमाती ते थड दरम्यान त्याचे गाडीला अपघात झाला व घटनास्थळीच या युवकाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार दीपक वळवी व कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेतली.