तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: May 31, 2014 23:54 IST2014-05-31T23:52:15+5:302014-05-31T23:54:30+5:30

मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू.

Youth's death by submerging in the lake | तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

खामगाव : मित्रासोबत पोहण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी १.३0 वाजेच्या सुमारास जनुना तलावात घडली. स्थानिक गौरक्षण रोडवरी दालफैलातील कुलदिप सुनिल देशमुख (१९) हा युवक त्याच्या मित्रासमवेत आज ३१ मे रोजी दुपारी १२.३0 वाजेच्या सुमारास शहरानजीकच्या जनुना तलावात पोहण्यासाठी गेला. दरम्यान तलावातील छत्री भागात कुलदीप मित्रासोबत पाण्यात पोहत असताना तो दुरवर पोहत गेला. मात्र परत येतांना त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या मित्राकडून मिळाली. कुलदीपचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कुलदिपने सायन्स या विषयात नुकतीच १२ वी ची परिक्षा दिली होती. त्याचा उद्या २ जूनला निकाल लागणार होता. आई-वडीलांना कुलदीप एकटाच असल्याची माहिती आहे. त्याच्या या दु:खद निधनाने त्याच्या दालफैल भागात शोककळा पसरली आहे.

Web Title: Youth's death by submerging in the lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.