रस्ता अपघातात युवकाचा मृत्यू
By Admin | Updated: April 5, 2017 23:43 IST2017-04-05T23:43:55+5:302017-04-05T23:43:55+5:30
बाळापूरनजिक असलेल्या भिंकुड नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने गणेशच्या दुचाकीस जबर धडक दिली. या घटनेत गणेशचा समाधान बोराडेचा जागीच मृत्यू झाला.

रस्ता अपघातात युवकाचा मृत्यू
पळशी बु. : येथील १९ वर्षीय युवकाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली.
पळशी बु. येथील १९ वर्षीय गणेश समाधान बोराडे व त्याचे मित्र ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान एम.एच.२८-एन६५१ या दुचाकीने पळशी बु. वरून अकोल्याकडे जात होते. बाळापूरनजिक असलेल्या भिंकुड नदीच्या पुलावर समोरून येणाऱ्या अज्ञात ट्रॅक्टरने गणेशच्या दुचाकीस जबर धडक दिली. या घटनेत गणेशचा जागीच मृत्यू झाला.