पोहायला गेलेल्या युवकाचा खदानित बुडून मृत्यू

By अनिल गवई | Updated: May 3, 2024 17:59 IST2024-05-03T17:57:50+5:302024-05-03T17:59:22+5:30

खामगाव: पोहायला गेलेल्या एका १८ वर्षीय युवकाचा खदानीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजता दरम्यान, ...

Youth who went swimming drowned in mine in khamgaon | पोहायला गेलेल्या युवकाचा खदानित बुडून मृत्यू

पोहायला गेलेल्या युवकाचा खदानित बुडून मृत्यू

खामगाव: पोहायला गेलेल्या एका १८ वर्षीय युवकाचा खदानीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजता दरम्यान, खामगाव तालुक्यातील पारखेड येथे घडली. ओम बाबुराव यादगीरे असे मृतक युवकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील पारखेड येथे काही खदानी आहेत. या खदानीत उन्हाळ्याच्या दिवसांत काही युवक पोहण्यासाठी जातात. शुक्रवारी दुपारी ओम बाबुराव यादगीरे नामक युवक देखील पोहण्यासाठी गेला. पोहताना दम तुटल्याने तो खदानीत बुडाला. पोहण्यासाठी गेलेला युवक खदानित बुडाल्याची माहिती मिळताच, गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरू केले. मात्र तोपर्यत बराच उशीर झाला होता. घटनास्थळी खामगाव ग्रामीण पोलीस तात्काळ दाखल झाले. बुडालेल्या युवकाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करण्यात आला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव येथील सामान्य रूग्णालयात आणण्यात आला. या घटनेमुळे पारखेड येथे एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: Youth who went swimming drowned in mine in khamgaon