युवकास मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:23 AM2021-07-21T04:23:52+5:302021-07-21T04:23:52+5:30

अमित सुनील बेंडवाल व त्याचा मित्र किरण गायकवाड हे १९ जुलै राेजी जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानात सायंकाळी ५ वाजता बसलेले ...

The youth was beaten and robbed | युवकास मारहाण करून लुटले

युवकास मारहाण करून लुटले

Next

अमित सुनील बेंडवाल व त्याचा मित्र किरण गायकवाड हे १९ जुलै राेजी जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानात सायंकाळी ५ वाजता बसलेले हाेते. या वेळी तेथे कृष्णा भास्कर पवार (रा. शिक्षक काॅलनी, चांडक ले आउट, बुलडाणा) व संतोष जाधव (रा. गोडे काॅलेजजवळ, बुलडाणा), किशोर ठाकरे (गोडे काॅलेजजवळ, बुलडाणा) तिघे आले. कृष्णा पवार याने लोखंडी राॅडने बेंडवाल याच्या हातावर व पायावर मारला. तसेच डाेक्यावरही राॅड मारला. तसेच बेंडवालकडे असलेला २० हजार रुपये किमतीचा माेबाइल व राेख २ हजार रुपये त्यांनी घेतले. किरण गायकवाड याने मला त्यांच्या तावडीतून सोडल्याने ते तिघे जण पळून गेल. या प्रकरणी बुलडाणा शहर पाेलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: The youth was beaten and robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.