जिगावात तरुणाचा खून; संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळला,  गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 19:37 IST2018-02-10T19:35:37+5:302018-02-10T19:37:57+5:30

नांदुरा : तालुक्यातील जिगाव येथे गोठ्यात तरुणाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळल्याने पोलिसांनी याप्रकरणी तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

youth murder; The body found in suspected surcumtunces | जिगावात तरुणाचा खून; संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळला,  गुन्हा दाखल

जिगावात तरुणाचा खून; संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळला,  गुन्हा दाखल

ठळक मुद्देयोगेश गजानन ढोरे (वय २४) याच्या गळ्यावर व हातावर वार करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह गोठ्यातील लाकडी दांडाला लटकविलेला १० फेब्रुवारीच्या सकाळी आढळून आला. नांदुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

नांदुरा : तालुक्यातील जिगाव येथे गोठ्यात तरुणाचा संशयास्पदस्थितीत मृतदेह आढळल्याने पोलिसांनी याप्रकरणी तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. जिगाव येथील योगेश गजानन ढोरे (वय २४) याच्या गळ्यावर व हातावर वार करुन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह गोठ्यातील लाकडी दांडाला लटकविलेला १० फेब्रुवारीच्या सकाळी आढळून आला. याबाबत गजानन रामदास मानकर वय २८ वर्षे रा. मडाखेड ता. जळगाव जामोद यांनी नांदुरा पो.स्टे.ला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, योगेश गजानन ढोरे याच्या भावाचा विवाह ८ फेब्रुवारीला जळगाव येथे संपन्न झाला होता. विवाहाच्या सुखाच्या क्षणानंतर तीन दिवसांनी ढोरे परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मावसभाऊ मृतक योगेश गजानन ढोरे वय २४ वर्षे रा. जिगाव ह्याला त्याच्या गावाजवळील गोठ्यात अज्ञात आरोपींनी मारून टाकून लटकवून ठेवले. या तक्रारीवरुन नांदुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास नांदुरा पोलिस करीत आहेत.

Web Title: youth murder; The body found in suspected surcumtunces