पद्मावती धरणात मासरुळ येथील युवक बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 19:23 IST2020-10-04T19:23:04+5:302020-10-04T19:23:17+5:30
युवक पद्मावती धरणात बुडाल्याची घटना ३ आॅक्टोबर रोजी घडली.

पद्मावती धरणात मासरुळ येथील युवक बुडाला
धामणगाव धाड : मच्छी पकडण्यासाठी गेलेला मासरुळ येथील युवक पद्मावती धरणात बुडाल्याची घटना ३ आॅक्टोबर रोजी घडली. धाड पोलिसांसह एनडीआरएफच्या पथकाने ४ आॅक्टोबर रोजी या युवकाचा शोध घेतला असता तो सापडला नाही. अरुण पवार असे युवकाचे नाव आहे.
मासरुळ येथील अरुण पवार हे शनिवारी मच्छि पकडण्यासाठी पद्मावती धरणात गेले होते. जाळे टाकल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. खोल पाण्यात गेल्याने ते बुडाले. त्यांच्या सहकाºयांच्या ही बाब निदर्शनास येताच प्रशासनास माहिती देण्यात आली. घटनेची माहिती धाड पोलिस व एनडीआरएफच्या पथकाने पद्मावती धरण गाठले. रविवारी पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकाने दिवसभर शोध मोहिम राबवली. वृत्त लिहीस्तोवर बुडालेल्या युवकाचा सापडला नव्हता. पुढील तपास धाड पोलिस करीत आहेत.