लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच तरूणाने संपविली जीवनयात्रा
By Admin | Updated: April 26, 2017 20:44 IST2017-04-26T20:44:51+5:302017-04-26T20:44:51+5:30
शिक्षक मुकुंदा लिंबाजी लहाने यांचा मुलगा सिध्दार्थ लहाने याने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना

लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच तरूणाने संपविली जीवनयात्रा
ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 26 - येथील शिक्षक मुकुंदा लिंबाजी लहाने यांचा मुलगा सिध्दार्थ लहाने याने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना २६ एप्रिल रोजी उघडकीस आली. सिध्दार्थ लहाने याचा विवाह निश्चित झाला होता. बुधवारी बस्त्याचा
कार्यक्रम ठरला होता. मात्र लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याने आपली जिवनयात्रा संपविली.
शिक्षक मुकुंदा लहाने यांचा मुलगा सिध्दार्थ लहाने (वय २५ वर्ष) हा २४ एप्रिल रोजी शेतातील भुईमुगा पाणी देवून येतो असे सांगून घरून निघून गेला होता. तेव्हापासून तो घरी परत आलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. बुधवारी वेणी गावाच्या शिवारातील रमेश खंडू देशमुख यांच्या शेतात अज्ञात ईसमाचे प्रेत दिसत असल्याची माहिती शेत मालकाने दिली. त्यावरून घटनास्थळी जावून समाधान लहाने याने पाहीले असता मृतक हा सिध्दार्थ लहाने असल्याचे सिध्द झाले. यावरून वेणीचे पोलिस पाटील राजेश शेवाळे यांनी मेहकर पोलिसांना माहिती दिली, पोलिस उपनिरिक्षक मोनाली मोरे, बीट जमादार रोहिदास जाधव, बद्रीनाथ मुंढे, गजानन साळवे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा करून मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी पाठविला. मृतक
सिध्दार्थ लहाने याचे लग्न ठरले होते. आज बुधवार २६ एप्रिल रोजी लोणार येथे बस्त्याचा कार्यक्रम ठरला होता. त्यानुसार पाहुणे मंडळी आली होती. मात्र लग्नाच्या बाहेल्यावर चढण्या आधिीच त्याने आपली जीवनयात्रा संपविली.