युवा शेतकऱ्याची आत्महत्या

By Admin | Updated: June 8, 2017 02:35 IST2017-06-08T02:35:08+5:302017-06-08T02:35:08+5:30

धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथील युवा शेतकरी प्रदीप विश्वनाथ गुंजाळ (वय ३२) यांनी कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे ७ जून रोजी निदर्शनास आले.

Youth Farmer Suicide | युवा शेतकऱ्याची आत्महत्या

युवा शेतकऱ्याची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव बढे : मोताळा तालुक्यातील सिंदखेड येथील युवा शेतकरी प्रदीप विश्वनाथ गुंजाळ (वय ३२) यांनी कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे ७ जून रोजी निदर्शनास आले.
प्रदीप गुंजाळ यांनी शेतकरी ६ जून रोजी रात्री शेतात जातो, असे सांगून घरून निघून गेले. ७ जूनच्या सकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून, स्टेट बँकेचे ४२ हजार रुपयाचे कर्ज आहे.
घटनेची माहिती मिळताच युवा कार्यकर्ते विनोद कदम व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची फिर्याद चेतन गुंजाळ यांनी धा.बढे पोलीस स्टेशनला दिली. ठाणेदार दीपक वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महाजन, जाधव, चंडोल पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Youth Farmer Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.