पत्नी माहेरी निघून गेल्याने युवकाची आत्महत्या
By विवेक चांदुरकर | Updated: September 9, 2023 15:26 IST2023-09-09T15:26:21+5:302023-09-09T15:26:49+5:30
तामगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

पत्नी माहेरी निघून गेल्याने युवकाची आत्महत्या
विवेक चांदूरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, वरवट बकाल (बुलढाणा) : संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथे २९ वर्षीय युवकाने पत्नी माहेरी गेल्यामुळे नैराश्यापोटी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.
काटेल येथील शांतीनगर भागातील देवानंद नामदेव वानखडे (२९) यांचा पत्नीसोबत वाद झाला. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेल्याने नैराश्यापोटी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. देवानंद यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांचे भाऊ देव किसन वानखडे यांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तामगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. देव किसन नामदेव वानखडे यांच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. तामगाव पोस्टेचे ठाणेदार प्रमोद उलेमाले यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार अशोक वावगे करीत आहेत.