बोहल्यावर चढण्याआधीच तरुणाची आत्महत्या

By Admin | Updated: April 27, 2017 01:50 IST2017-04-27T01:50:08+5:302017-04-27T01:50:08+5:30

शारा : येथील शिक्षक मुकुंदा लिंबाजी लहाने यांचा मुलगा सिद्धार्थ लहाने याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ एप्रिल रोजी उघडकीस आली.

Youth commits suicide even before climbing | बोहल्यावर चढण्याआधीच तरुणाची आत्महत्या

बोहल्यावर चढण्याआधीच तरुणाची आत्महत्या

शारा : येथील शिक्षक मुकुंदा लिंबाजी लहाने यांचा मुलगा सिद्धार्थ लहाने याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ एप्रिल रोजी उघडकीस आली. सिद्धार्थ लहाने याचा विवाह निश्चित झाला होता, बुधवारी बस्त्याचा कार्यक्रम ठरला होता; मात्र लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याने आपली जीवनयात्रा संपविली.
शिक्षक मुकुंदा लहाने यांचा मुलगा सिद्धार्थ लहाने (वय २५ वर्ष) हा २४ एप्रिल रोजी शेतातील भुईमुगाला पाणी देऊन येतो, असे सांगून घरून निघून गेला होता. तेव्हापासून तो घरी परत आलाच नाही. त्याच्या नातेवाइकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. बुधवारी वेणी गावाच्या शिवारातील रमेश खंडू देशमुख यांच्या शेतात अज्ञात इसमाचे प्रेत दिसत असल्याची माहिती शेत मालकाने दिली. त्यावरून घटनास्थळी जावून समाधान लहाने याने पाहिले असता मृत हा सिद्धार्थ लहाने असल्याचे सिद्ध झाले. यावरून वेणीचे पोलीस पाटील राजेश शेवाळे यांनी मेहकर पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक मोनाली मोरे, बीट जमादार रोहिदास जाधव, बद्रीनाथ मुंढे, गजानन साळवे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. सिद्धार्थ लहाने याचे लग्न ठरले होते. बुधवार, २६ एप्रिल रोजी लोणार येथे बस्त्याचा कार्यक्रम ठरला होता. त्यानुसार पाहुणे मंडळी आली होती; मात्र लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधिच त्याने आपली जीवनयात्रा संपविली.

Web Title: Youth commits suicide even before climbing