बीएसएनएल टॉवरवर चढला युवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 16:40 IST2020-07-10T16:38:29+5:302020-07-10T16:40:27+5:30
बीएसएनएल टॉवरवर एक युवक चढल्याची घटना १० जुलै रोजी दुपारी चार वाजेदरम्यान घडली.

बीएसएनएल टॉवरवर चढला युवक
बुलडाणा: जिल्हाधिकारी कार्यालयानजीक असलेल्या बीएसएनएल टॉवरवर एक युवक चढल्याची घटना १० जुलै रोजी दुपारी चार वाजेदरम्यान घडली. ही व्यक्ती जवळपास एक तासापासून टॉवरवरच असल्याने पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
बीएसएनएलच्या टॉवरवर चढलेल्या व्यक्तीचे नाव गजानन रोकडे (रा. सव) असे आहे. एक तासापासून हा व्यक्ती टॉवरवर असल्याने बुलडाणेकर एक थरार अनुभवत आहेत. टॉवरवर चढलेल्या व्यक्तीला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या गर्दीवर नियंत्रण आणले. टॉवरवर चढलेल्या युवकाचे मित्र व त्याच्या कुटुंबियांना घटनास्थळी बोलावण्यात आले आहे. परंतू हा व्यक्ती नेमका कशासाठी टॉवरवर चढला याची कुठलीच माहिती अद्याप मिळाली नाही. याठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार व सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित आहेत.