दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने युवकास मारहाण

By अनिल गवई | Updated: December 16, 2023 15:44 IST2023-12-16T15:42:13+5:302023-12-16T15:44:09+5:30

पैसे देण्यास नकार दिल्याने ओम जंजाळ याने धारधार शस्त्राने गालावर, हातावर आणि डोक्यावर मारहाण केली.

Youth beaten for not paying for drinking | दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने युवकास मारहाण

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने युवकास मारहाण

खामगाव: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने एका युवकास तिघांनी संगनमत करून धारधार शस्त्राने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री स्थानिक कोठारी फैल भागात घडली. याप्रकरणी शहर पोलीसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.

याबाबत सत्य विजय कांबळे रा. चांदमारी याने शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले की, तो रात्री ८ वाजता दरम्यान कोठारी फैलातील एका शाळेजवळ उभा होता. त्यावेळी शिंदे नामक युवक तेथे आला. त्याच्या सोबतच ओम जंजाळ आणि ऋतिक इंगळे हे दोघेही तिथे आले. कांबळे याला दारू पिण्यासाठी पैसे मागितले.

पैसे देण्यास नकार दिल्याने ओम जंजाळ याने धारधार शस्त्राने गालावर, हातावर आणि डोक्यावर मारहाण केली. तर शिंदे आणि इंगळे यांनी हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले. याप्रकरणी पोलीस तक्रार आणि वैद्यकीय अहवालावरून शहर पोलीसांनी उपरोक्त तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३४ गुन्हा दाखल केला. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: Youth beaten for not paying for drinking