युवकाची दगडाने ठेचून निघृण हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 13:48 IST2019-05-13T13:47:54+5:302019-05-13T13:48:01+5:30
शेगाव : शहरालगतच्या जानोरी रेल्वेगेटजवळ एका ३० वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.

युवकाची दगडाने ठेचून निघृण हत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शहरालगतच्या जानोरी रेल्वेगेटजवळ एका ३० वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
रेल्वे कर्मचाऱ्यांना जानोरी गेटजवळ एका युवकाचे प्रेत रस्त्यावर पडून असल्याचे आढळून आले. ही माहिती शहर पोलीसांना मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळ गाठले. राजेश उर्फ गणेश गजानन बोदडे (रा.मंदिर परिसर, शेगाव) याचा हा मृतदेह असल्याचे तपासात समोर आले. मृतकाचा चेहरा छिन्नविछीन्न अवस्थेत आढळून आल्याने मृतक युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. मृतक हा मागील तीन दिवसांपासून घरून बेपत्ता होता असे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर पोलीसांनी मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक सईबाई मोटे शासकीय उपजिल्हा रूग्णालयात पाठवले आहे. प्रकरणी मृतकाचा मावसा संतोष प्रल्हाद तायडे (रा. काँग्रेसनगर शेगाव) यांनी पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्ती विरोदात शेगाव शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृतक खूनाच्या गुन्हयाच्या आरोपी
या घटनेतील मृतक राजेश बोदडे हा एका वृध्दाच्या खूनाच्या घटनेतील आरोपी असून तो जेलमधून जामीनावर सुटून आलेला होता, अशी माहिती मिळाली आहे. १६ आॅगस्ट २०१६ रोजी सायंकाळच्या सुमारास मृतक व त्याचा सहकारी रूपेश याने मंदिर रोडवरील फुटपाथवर एका वृध्द भिकाºयाला बेदम मारहाण करून त्याची हत्या केली होती. सदरहु घटनेचे चित्रिकरण भवानी पार्किंगच्या कॅमेºयात रेकॉर्ड झाले होते. त्यानंतर काही वेळातच पोलीसांनी मृतक राजेश व त्याचा मित्र रूपेश याला बेड्या ठोकल्या होत्या. यावरून हल्ली मृतक राजेश हा जमातीवर जेलमधून बाहेर आलेला असतांना आज सकाळी त्याची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.