शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

पार्टीसाठी गेलेल्या युवकाचा विहिरीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 10:41 AM

खामगाव येथील निळकंठ नगरातील दीपक शर्मा (३७) हा युवक आंघोळीसाठी विहिरीत उतरला

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: लॉकडाउनमध्ये वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थिती दर्शविणे खामगाव येथील एका युवकाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी रात्री चिखली बु. शिवारात घडली.खामगाव येथील रहीवासी असलेल्या काहींनी मित्राच्या वाढदिवसानिमित्ताने पार्टी ठेवली. चिखली बु. शिवारातील विठ्ठल लाहुडकार यांच्या शेतात १४-१५ जण पार्टीसाठी जमले. दरम्यान, खामगाव येथील निळकंठ नगरातील दीपक शर्मा (३७) हा युवक आंघोळीसाठी विहिरीत उतरला. बराच वेळानंतरही तो परत न आल्याने उपस्थितांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो मिळून आला नाही. जलंब पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर दीपकच्या शोधार्थ माटरगाव येथील पट्टीचे पोहणारे प्रकाश खवले, संतोष धोटे यांना पाचारण करण्यात आले. बऱ्याच वेळानंतर दीपकचा मृतदेह विहिरीत सापडला. यावेळी ठाणेदार पी. आर. इंगळे, एएसआय राजेंद्र देशमुख, विनोद राठोड, राजू तायडे, पोलिस पाटील सुनील खडसे, अनंता शिंदे उपस्थित होते.याप्रकरणी दीपक सोबत पार्टीसाठी गेलेले त्याचे नातेवाईक प्रशांत शंकर शर्मा यांनी जलंब पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे.पार्टीसाठी जमलेल्यांविरोधात गुन्हा !कोविड-१९ या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभर संचारबंदी लागून करण्यात आली आहे. कोविड विषाणू संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान, याकरीता शासन वेळोवेळी करीत असलेल्या नियमांचे पालन न करता, कोणत्याही परवानगी शिवाय केवळ वाढदिवस पार्टी करीता एकत्र जमणाºयो १४ जणांविरुद्ध पोस्टे जलंब येथे नियमांचे उल्लंघन बाबत गुन्हा नोंद सुद्धा करण्यात आला आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावAccidentअपघात