खामगावातील युवक-युवतीची बाळापुरात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 10:25 IST2020-06-30T10:21:36+5:302020-06-30T10:25:30+5:30

दोघांचे मृतदेह नदीच्या पुलाखाली तरंगतांना दिसले.

Young man and woman from Khamgaon commit suicide in Balapur | खामगावातील युवक-युवतीची बाळापुरात आत्महत्या

खामगावातील युवक-युवतीची बाळापुरात आत्महत्या

ठळक मुद्देयुवकाच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे.युवती अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव/बाळापुर : खामगावातील युवक-युवतीने बाळापुरातील  नदीच्या पुलावरून नदीच्या पात्रात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. माहिती मिळताच पोलिसांनी त्यांचे मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी अकोला येथील सर्वोपचार रूग्णालयात पाठविले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर असलेल्या मन नदी पुलावरून युवक-युवतीने उडी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या दोघांचे मृतदेह नदीच्या पुलाखाली तरंगतांना दिसले. त्यामध्ये युवती अल्पवयीन असल्याची माहिती आहे. तर युवकाच्या खिशात चिठ्ठी आढळून आली आहे. खामगावातील सुटाळा बु. येथील शिवाजी नगरातील अक्षय अशोक घरत (वय-२०) हा गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता होता. तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. यापूर्वी त्याच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती. बेपत्ता असल्याने त्याच्या नातेवाईकाकडून शोध घेण्यात आला होता. त्याची प्रेयसी ही खामगाव परिसरातील रहिवासी आहे.
त्या दोघांनीही नदीत उडी घेत आत्महत्या केली. पोलीसांनी दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले. दरम्यान रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील मुलगी लोणार तालुक्यातील धाबा येथील कोमल राजू बाजड (वय १७) असून ती सध्या अकोला मुक्कामी असल्याचे समजते.

Web Title: Young man and woman from Khamgaon commit suicide in Balapur