शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही गाव दारूमुक्त करा; आम्ही हगणदरीमुक्त करतो

By admin | Updated: June 2, 2015 02:26 IST

हनवतखेड येथील महिलांनी घातले सीईओ मुधोळ यांना साकडे

अशेक इंगळे /सिंदखेडराजा : प्रत्येक गाव खेड्यात, वाडी- तांड्यावर गावठी तसेच देशी दारूचा महापूर असून, या दारूपायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. गाव हगणदरीमुक्त करण्यापेक्षा प्रथम दारूमुक्त करा, असा सवाल हनवतखेड येथील २00 महिलांनी जि.प.च्या सीईओ दीपा मुधोळ यांच्यासमोर केला.हनवतखेड तीन हजार लोकवस्तीचे गाव असून, ग्रामसमृद्ध योजनेत या गावाने पुढाकार घेतला होता. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ ३0 मे रोजी हनवतखेड येथे ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी गेल्या होत्या. जि.प. प्राथमिक शाळेत महिला व पुरुष मोठय़ा संख्येने उपस्थित होते; परंतु महिलांच्या मनातील खदखद वेगळीच होती.यावेळी एका महिलेने तर चक्क प्रथम गावातील अवैध दारू विक्रीची दुकाने बंद करा, आम्ही गाव हगणदरीमुक्त करतो, असा प्रतिप्रश्न उपस्थित करून एकप्रकारे जिल्हा परिषद आणि पोलीस विभागाला आवाहन दिले. सिंदखेडराजाचे पोलीस गावात येतात, दारू विक्रेत्यांकडून हप्ते घेतात आणि निघून जातात, असाही आरोप एका महिलेने केला. लाहण्यापासून मोठय़ापर्यंत सर्वांनाच दारूचे व्यसन जडले आहे. संपूर्ण गाव व्यसनाधीन होत आहे. राजकीय नेते या विषयात हात घालत नाहीत. यावर आपण मार्ग काढावा, अशी विनंती महिलांनी केली.