शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी यात्रेत यंदा मनोरंजनावर बंदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 1:12 AM

बुलडाणा : हिंदू-मुस्लींच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी येथील हाजी हजरत अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानी बाबा यांच्या यावर्षीच्या यात्रा महोत्सवात मनोरंजनावरच बंधणे घालण्यात आली आहेत. यात्रेदरम्यान फिरते चित्रपटगृह आणि मनोरंजनासाठी असलेले रहाट पाळणे व तत्सम   साधनावरच बंदी घालण्यात आली आहे.

ठळक मुद्देसमन्वय समितीच्या बैठकीतील निर्णय 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : हिंदू-मुस्लींच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी येथील हाजी हजरत अब्दुल रहेमान ऊर्फ सैलानी बाबा यांच्या यावर्षीच्या यात्रा महोत्सवात मनोरंजनावरच बंधणे घालण्यात आली आहेत. यात्रेदरम्यान फिरते चित्रपटगृह आणि मनोरंजनासाठी असलेले रहाट पाळणे व तत्सम   साधनावरच बंदी घालण्यात आली आहे. यात्रेदरम्यान परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता जिल्हा न्यायदंडाधिकारी या नात्याने हा निर्णय घेतला आहे.अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या या यात्रेच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी दुबे, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा, निवासी उपजिल्हाधिकारी ललित वर्‍हाडे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी  बी. बी. महामुनी, रायपूरचे ठाणेदार जलालउद्दीन सय्यद यांच्यासह पंचायत समिती सदस्य शेख चाँद मुजावर, शेख हाशम मुजावर  सैलानी ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल समद प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान, यात्रेच्या ठिकाणी येणार्‍या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, पार्किंग व्यवस्था निट व्हावी, याबाबत सूचना दिल्या.

व्यावसायिकांचे आधार आणि मोबाइल क्रमांक घेणारयात्रेमध्ये दुकाने थाटणार्‍या व्यावसायिकांचे आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांकही यंत्रणेने घ्यावेत, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या आहेत. सोबतच यात्रा परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून लाईटिंग आणि वॉच टॉवर लावण्याबाबतही जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी यंत्रणेला बजावले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा